लखनऊ, 25 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील शाहजहापुरमध्ये पिज्जा आणि बर्गरची (Pizza And Burger) ऑर्डर पोहोचविण्यासाठी गेलेल्या डिलिव्हरी बॉयला (Delivery Boy) गोळी मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डिलिव्हरी बॉटने फाटलेली नोट घेण्यास नकार दिला होता. या घटनेनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
रात्री उशिरा डिलिव्हरी देण्यासाठी गेला होता सचिन...
सचिन कुमार हा टाऊन हॉलच्या विलंका कॅफैमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. कॅफेमध्ये आलेल्या पिझ्झा-बर्गरच्या ऑर्डरची डिलिव्हरी पोहोचविण्यासाठी तो ग्राहकाच्या घरी पोहोचला होता. यावेळी त्याच्यासोबत सहकारी रितिकदेखील होता. दोघेही बुधवारी रात्री 12 वाजता जलालनगर निवासी नदीमच्या घरी डिलिव्हरी देण्यासाठी पोहोचला.
शिवीगाळ अन् धमकी देण्याआधी हजारदा विचार करा, परिणाम आहेत भयंकर वाईट
200 ची फाटलेली नोट घेण्यास विरोध..
रितिकने दिलेल्या माहितीनुसार, सचिनला डिलिव्हरीचे 197 रूपये घ्यायचे होते. आरोप आहे की, नदीमने त्याला 200 रुपयांची फाटलेली नोट दिली. फाटलेली नोट घेण्यास नकार दिल्यानंतर नदीम आणि त्याचा भाऊ संतापले. दोघेही शिवीगाळ करू लागले. हे पाहून सचिन विरोध करू लागला. ज्यानंतर नदीमने सचिनच्या पाठीवर गोळी झाडली. यावेळी रितिक सुदैवाने बचावला.
हल्लेखोर फरार, पोलिसांकडून शोध सुरू...
घटनेनंतर पोलिसांनी जखमी सचिनला रुग्णालयात दाखल केलं. येथे त्याची प्रकृती पाहून मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Gun firing, Pizza, Uttar pradesh