नागपूर, 19 डिसेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. नागपूरमध्ये दाखल होताच उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. हॉटेल रेडिसनमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला घेरण्याच्या दृष्टीने या बैठकीत तयारी होणार आहे. दरम्यान महाविकासआघाडीची आज चार वाजता होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. आजच्याऐवजी ही बैठक आता उद्या सकाळी 9 वाजता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. महाविकासआघाडीच्या या बैठकीआधी उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाची रणनीती ठरवणार आहेत. सेनेचं कार्यालय मिळालं शिंदे गटाला, उद्धव ठाकरेंचे फोटो काढले शिंदे-ठाकरे सामना नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे, त्यामुळे आता विधिमंडळात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातला सामना बघायला मिळू शकतो. शिवसेनेत झालेल्या भुकंपानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समोरासमोर येणार आहेत. 2019 साली मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे विधानपरिषदेचे सदस्य झाले. जून महिन्यात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असताना उद्धव ठाकरेंनी आपण आमदरकीही सोडत असल्याचं सांगितलं होतं, पण त्यांनी आमदार म्हणून कायम राहण्याचा निर्णय घेतला. मला धमकी आली तेव्हा सरकारने…." नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर निशाणा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







