वाशिम, 10 जून : दोन दिवसांपूर्वी बारावीच्या परिक्षेचा निकाल (12th exam result) लागला यामध्ये राज्यात मुलींनीच बाजी मारली. दरम्यान अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांनी (poor student) अतिषय कष्टातून बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवलं. दरम्यान वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्याच्या वडजी गावात (washim district, risod tehsil, vadaji village) अशीच एक घटना समोर आली आहे. मागच्या दोन महिन्यांपूर्वी बारावीच्या परिक्षा झाल्या यामध्ये वडजी गावातील एका मुलीने वडिलांच्या (fathers death) अंत्यसंस्कारादिवशी इंग्रजीचा पेपर दिला होता. (Englishpaper exam)
अतिशय दुख:द घटनेला सामोरे जात या मुलीने पेपर दिला होता. दरम्यान या मुलीने परिक्षेचा निकाल लागल्यानंतर वडिलांना खरी आदरांजली वाहिली. परिक्षेत तिने घवघवीत यश मिळवल्याने तिचे कौतुक होत आहे. घरात वडिलांचा मृतदेह असतांना बारावीचा पेपर देण्याचा निर्णय मुलीने घेतला आणि इंग्रजीचा पेपर दिलाही. त्यावेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. घरात वडिलांचा मृतदेह असतांना साक्षी बोरकर या विद्यार्थीनीने बारावीचा इंग्रजी पेपर दिल्यानंतर तिच्या वडिलांवर अंत्यसंस्कार केले.
हे ही वाचा : Numerology : राजकारणातल्या व्यक्तींना आज नवं पद ऑफर केलं जाईल, अंकशास्त्रानुसार पाहा तुमचं भविष्य!
रिसोड तालुक्यातील वडजी येथील शेतकरी रामेश्वर बोरकर यांचे 4 मार्च रोजी पहाटे ब्रेन हॅमरेजने निधन झाले. त्यांची मुलगी साक्षी ही बारावीला असल्याने तिची बारावीची परीक्षा सुरू होती. वडजी येथील रामेश्वर शेषराव बोरकर यांचं अचानक निधन झाल्याने त्यांच्या परिवारावर मोठी शोककळा पसरली होती. यामुळे मुलीचे शिक्षण थांबू नये यासाठी नातेवाईकांसह घरच्यांनी तिला परिक्षेला जाण्यास परवानगी दिली.
मुलीला नातेवाईकांनी परीक्षेला जाण्यासाठी तयार केले. परीक्षा देऊन आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला. त्यामुळे साक्षीने परीक्षा दिली. घरात वडिलांचा मृतदेह आणि दुसरीकडे आयुष्याच्या प्रमुख टप्प्याचा इंग्रजीचा पेपर या दुहेरी संकटात सापडलेल्या साक्षी बोरकरने परिक्षा दिली यामुळे तिच्या धैर्याचे कौतुकही केले जात आहे.
हे ही वाचा : Weight Loss: वजन कमी करण्याच्या प्रयत्नात या चुका तुम्हीही कराल; फायद्याऐवजी नुकसानच होईल
दरम्यान, बुधवारी 8 जूनला बारावीचा निकाल जाहीर झाला. साक्षी बोरकरला 90 टक्के गुण प्राप्त झाले आहेत आणि इंग्रजीच्या पहिल्या पेपरमध्ये 79 गुण मिळवून साक्षीने यश संपादन केले आहे. तिच्या या निर्णयाचे व यशाचे सर्वत्र कौतुक होत. तिच्या या यशामुळे वडिलांना खरी आदरांजली असल्याचे बोलले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.