Home /News /lifestyle /

Numerology : राजकारणातल्या व्यक्तींना आज नवं पद ऑफर केलं जाईल, अंकशास्त्रानुसार पाहा तुमचं भविष्य!

Numerology : राजकारणातल्या व्यक्तींना आज नवं पद ऑफर केलं जाईल, अंकशास्त्रानुसार पाहा तुमचं भविष्य!

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 10 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

    ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 10 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुम्हाला भरपूर आत्मविश्वासाची आणि मेडिटेशनची गरज भासू शकते. प्रवास आल्हाददायक होतील, नियोजित ठिकाणी वेळेवर पोहोचाल. तुमची हुशारी आणि ओळख यांमुळे कामं वेळेत पूर्ण होतील. तसंच आर्थिक लाभही होईल. आज सूर्यदेव आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद नक्की घ्या. खेळाडूंना प्रशिक्षकांमुळे विजय मिळेल. तुमच्या खेळासंबंधी एखादी मोठी व्यक्ती आज तुम्हाला भेटेल. महिला स्वयंपाकाच्या माध्यमातून आपली छाप पाडतील. सूर्यदेवाला जल अर्पण करणं उत्तम. शुभ रंग : Yellow and Orange शुभ दिवस : रविवार आणि गुरुवार शुभ अंक : 3 दान : कृपया सूर्यफुलाचं तेल दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमची विचार करण्याची पद्धत आणि आजचा दिवस यात भरपूर फरक राहील. त्यामुळे आज वैयक्तिक आयुष्यात, तसंच कामाच्या ठिकाणी भावनिक न होता, व्यावहारिकपणे विचार करणं गरजेचं आहे. नातेवाईक आणि मुलांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी उत्तम दिवस. आज केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. लिक्विड्स, एज्युकेशन, साहित्य, फायनान्स, इलेक्ट्रॉनिक्स, औषध, एक्सपोर्ट-इम्पोर्ट, सोलार एनर्जी, शेती, पेट्रोल आणि केमिकल्स या क्षेत्रांमधल्या व्यक्तींना मोठा फायदा संभवतो. शुभ रंग : Blue and Orange शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना आणि गायी-गुरांना पिण्याचं पाणी द्या. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळण्यास थोडा वेळ लागेल. आज विद्यार्थी, गृहिणी, वकील, सीए, गायक, चित्रकार, लेखक आणि डान्सर असलेल्या व्यक्तींसाठी अतिशय भाग्याचा दिवस आहे. आज लिखित संदेशामधून आपल्या जोडीदारावर छाप पाडाल; मात्र हुरळून जाऊन प्रपोज करणं टाळा. खेळाडूंना जुन्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचा फायदा होईल. राजकीय नेते किंवा सरकारी अधिकाऱ्यांना मोठ्या जनसमुदायाचं लक्ष आपल्याकडे वळवणं अवघड जाईल. विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यापूर्वी किंवा मुलाखतीपूर्वी गुरुमंत्राचा जप करणं फायद्याचं ठरेल. महिलांनी आज पिवळ्या रंगाचे पदार्थ बनवून संपूर्ण कुटुंबाला द्यावेत, यामुळे गुरू ग्रहाची शक्ती वाढेल. शुभ रंग : Orange and Red शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया मंदिरामध्ये चंदन दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजच्या दिवसाचं अगदी चांगलं व्यवस्थापन कराल. त्यामुळे काम अगदी चोख होईल. दुपारच्या जेवणानंतर घेतलेले सर्व निर्णय़ तुमच्या फायद्याचे ठरतील. आयटी कर्मचारी, प्रॉपर्टी डीलर्स, हॉटेल व्यावसायिक, उत्पादक, टेलिकॉम बिझनेस आणि डिफेन्स या क्षेत्रातल्या व्यक्तींना आर्थिक फायदा होईल. आज गुंतवणूक केलेल्या पैशांचा परतावा मिळण्यास थोडी वाट पाहावी लागेल. आज नियोजन करण्यात अधिक वेळ व्यतीत करा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला घ्या. आज लिंबूवर्गीय फळं खाणं फायद्याचं ठरेल. तसंच, आपला छंद जोपासण्यासाठी थोडा वेळ काढा. शुभ रंग : Brown शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया गरिबांना हिरवं धान्य दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज काही गोष्टींबाबत सावधगिरी बाळगण्याचा दिवस आहे. तुमची गुपितं सहकाऱ्यांसोबत शेअर करणं टाळा. मित्र वा नातेवाईकांसोबत असताना भावनिकपणे नाही, तर व्यावहारिक दृष्टीने विचार करा. राजकीय नेते आणि उत्पादकांना आज आर्थिक फायदा संभवतो. ग्लॅमर, मीडिया, फॉरीन कमोडिटीज आणि खेळाशी संबंधित क्षेत्रांतल्या व्यक्तींना विशेष अप्रैझल मिळेल. मुलाखतीला शेवाळी रंगाचे कपडे घातल्यास फायदा होईल. आज पार्टी करणं वा मांसाहार टाळा. प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने लागतील. तसंच, खेळाडूंना मोठं यश मिळेल. शुभ रंग : Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया गरिबांना साखर दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज वैयक्तिक गोष्टींमध्ये नशीब तुमच्या बाजूने असेल, तर बिझनेसमध्ये तुमच्या चांगल्या कामाचा फायदा मिळेल. तुम्हाला चांगला जोडीदार मिळाल्याबद्दल तुम्ही आज देवाचे आभार मानाल. पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देणं टाळू नका. आज जोडीदारासोबत काही वेळ व्यतीत करा. नातेसंबंध बळकट होतील. सरकारी टेंडर घेणं फायद्याचं ठरेल. वाहन, मोबाइल, घर इत्यादी गोष्टी खरेदी करण्यासाठी, तसंच एखादी सहल आयोजित करण्यासाठी उत्तम दिवस. शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. अभिनय किंवा राजकारण क्षेत्रामध्ये करिअरची संधी शोधणाऱ्यांनी आज येणारी ऑफर टाळू नये. शुभ रंग : Blue and Peach शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया पांढरं नाणं दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस बऱ्याच चढ-उतारांचा आहे. त्यामुळे बिझनेस व्यवहार करताना विचार करणं गरजेचं आहे. मेडिकल चेकअप करायचं असल्यास संध्याकाळी करावं. आज खरं तर कोणताही निर्णय घेणं टाळा. ज्येष्ठांची सेवा करणं फायद्याचं ठरेल. विरुद्धलिंगी व्यक्तीने दिलेला एखादा सल्ला स्वीकारा. पैशांची योग्य बचत करण्यासाठी वकिलाचा सल्ला घ्याल. सॉफ्टवेअर आणि राजकारणासंबंधी बिझनेस व्यवहार फायद्याचे ठरतील. विवाहासाठी आज येणारे प्रस्ताव टाळू नका, फायदा होईल. भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा-अभिषेक करणं उत्तम. शुभ रंग : Yellow शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया गरिबांना डाळी दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही एक चांगले फिनिशर आहात आणि हीच तुमची जमेची बाजू आहे. त्यामुळे सर्व कामं वेळेत पूर्ण करा. आज तुमची हुशारी आणि पैसा यांचा ठिकठिकाणी वापर कराल. कायदेशीर प्रकरणातून सुटका होण्यासाठी एखादी मोठी व्यक्ती किंवा पैशांची मदत घ्याल. बिझनेस व्यवहारांमध्ये ओळखीचा फायदा होईल. विसंवादामुळे तुमच्या जोडीदाराची तुमच्या बाबतीत तक्रार राहील. विद्यार्थ्यांनी स्पर्धेला उपस्थित राहताना भडक रंगाचे कपडे घालणं टाळावं. आज तुम्ही घेत असलेले सर्व निर्णय फायद्याचे ठरतील. खेळाडूंसाठी आज भाग्याचा दिवस आहे. आज प्रवासाचा बेत असेल, तर तो टाळणं वा पुढे ढकलणं उत्तम. दानधर्म केल्याने फायदा होईल. शुभ रंग : Green शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरजूंना चपला दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज जोडीदार किंवा सहकाऱ्यांशी बोलताना पारदर्शकता ठेवा. अन्यथा भविष्यात मोठी समस्या उद्भवू शकते. विद्यार्थी आणि खेळाडूंसाठी उत्तम दिवस. सरकारी टेंडर आणि संबंधित व्यवहार सुरळीत पार पडतील. ग्लॅमर, एअरलाइन्स, सॉफ्टवेअर, ऑकल्ट सायन्स, संगीत, मीडिया किंवा शिक्षण क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना भरपूर प्रसिद्धी मिळेल. राजकारणातल्या व्यक्तींना आज नवं पद ऑफर केलं जाईल. आजचा दिवस भाषण, मुलाखत, स्पर्धा परीक्षा यांसाठी उत्तम आहे. संगीत क्षेत्रातल्या व्यक्तींच्या पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. डॉक्टर आणि सर्जन यांना पुरस्कार मिळतील. सहलीचे वा प्रवासाचे बेत फायद्याचे ठरतील. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया कोणत्याही स्वरूपात लाल मसूर दान करा. 10 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : सुंदर पिचाई, नंदमुरी बालकृष्ण, प्रकाश पदुकोण, मिका सिंग, राहुल बजाज, सुब्रता रॉय
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Numerology

    पुढील बातम्या