मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Weight Loss: वजन कमी करण्याच्या प्रयत्नात या चुका तुम्हीही कराल; फायद्याऐवजी नुकसानच होईल

Weight Loss: वजन कमी करण्याच्या प्रयत्नात या चुका तुम्हीही कराल; फायद्याऐवजी नुकसानच होईल

इंटरनेट, युट्युबवर सांगितलेले अनेक उपाय वचन कमी करण्यासाठी उपयुक्त नसतात. अनेक उपाय आपण करत राहतो, मात्र त्याचा चांगला परिणाम दिसत नसल्याने निराशा येते, वजन कमी करण्याच्याबाबतीत होणाऱ्या चुकांविषयी जाणून घेऊया.

इंटरनेट, युट्युबवर सांगितलेले अनेक उपाय वचन कमी करण्यासाठी उपयुक्त नसतात. अनेक उपाय आपण करत राहतो, मात्र त्याचा चांगला परिणाम दिसत नसल्याने निराशा येते, वजन कमी करण्याच्याबाबतीत होणाऱ्या चुकांविषयी जाणून घेऊया.

इंटरनेट, युट्युबवर सांगितलेले अनेक उपाय वचन कमी करण्यासाठी उपयुक्त नसतात. अनेक उपाय आपण करत राहतो, मात्र त्याचा चांगला परिणाम दिसत नसल्याने निराशा येते, वजन कमी करण्याच्याबाबतीत होणाऱ्या चुकांविषयी जाणून घेऊया.

मुंबई, 10 जून : इंटरनेटवर आपल्याला कोणत्याही गोष्टींची माहिती मिळते. यावर आपण काहीही शोधतो आणि त्याचे उत्तर आपल्या समोर येते. आरोग्याच्या अनेक समस्या जाणून घेण्यासाठीही लोक इंटरनेटची सर्वाधिक मदत घेतात. यामध्ये सर्वात जास्त विचारलेला प्रश्न म्हणजे वजन कसे कमी (Weight Loss) करायचे किंवा वजन कमी करण्याचे उपाय कोणते. त्यामुळे या विषयच्या अनेक टिप्स इंटरनेटवर मिळतील, ज्यामध्ये दावा केला जातो की त्यांचा वापर केल्याने काही दिवसांत आपले वजन कमी होऊ शकते. मात्र, हे सगळे उपाय खरे नसतात. अशी अनेक पेये गुगल आणि यूट्यूबवर सांगण्यात आली आहेत, जी वजन झपाट्याने कमी करण्यास मदत करतात. आपणही अशा अनेक गोष्टी करून पाहतो, पण कधी कधी त्याचा परिणाम निराशाजनक (Overrated Drinks for Weight Loss) असतो.

त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच काही पेयांबद्दल सांगणार आहोत, जे वजन कमी करण्यात तितके प्रभावी नाहीत, जेवढा त्यांच्याविषयी दावा केला जातो. अशी पेय कोणती आहेत, त्याविषयी जाणून घेऊया.

आले आणि मध पाणी -

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आलं हा सर्वात प्रभावी घटक मानला जातो. सर्दी आणि खोकला टाळण्यासाठी हा एक नैसर्गिक उपाय आहे. मात्र, वजन कमी करण्यासाठी आले आणि मधाचे पाणी पिणे उपयोगी नाही. रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळे लोकांना नक्कीच ऊर्जा मिळते, त्यामुळे आपल्याला व्यायामासाठी अधिक वेळ मिळतो, पण ही पेये काही जादू नाहीत.

सफरचंद व्हिनेगर -

वजन कमी करण्यासाठी किंवा चरबी कमी करण्याच्या बाबतीत खूप चांगले मानले जाणारे दुसरे पेय म्हणजे अ‌ॅपल सायडर व्हिनेगर. यात जास्त काळ आपले पोट भरलेले ठेवण्याची क्षमता नक्कीच आहे आणि पचनास मदत होते पण चरबी जाळण्यासाठी ते उपयोगी ठरत नाही. तसेच, ज्या लोकांना अॅसिडिटीचा त्रास होतो त्यांनी सफरचंद सायडर व्हिनेगरचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.

स्मूदी -

जेव्हा डाएटिंगचा विचार केला जातो तेव्हा असे म्हटले जाते की स्मूदी हे इतर वातित (aerated) आणि दुधावर आधारित पेयांपेक्षा अधिक प्रभावी आहे. स्मूदीज पोषक तत्वांनी भरलेले असले आणि तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटत असले तरी ते शरीरातील साखरेची पातळी वाढवू शकतात. साखर चरबी वाढविण्यास हातभार लावते त्यामुळे मिळालेल्या पोषणाचा उलटा परिणाम होऊ शकतो. वजन कमी करण्याच्या बाबतीत स्मूदीज फार उपयोगी नाही.

हे वाचा - भरपूर पाणी पिणं फायदेशीर असलं तरी हे शारीरिक त्रास त्यामुळेच होऊ शकतात

फळांचे रस -

निरोगी फळांपासून बनवलेले रस स्मूदीसारखेच असतात. फळे खाणे जास्त फायदेशीर आहे. फळांचे ज्युस हेल्दी वाटत असले तरी त्यामध्ये साखर, दूध इत्यादी गोष्टी मिक्स केल्याने त्याचा वजन कमी करण्यासाठी उपयोग होत नाही.

हे वाचा - 40 नंतर महिला अशा जाडजुड का बरं होतात? एक्सपर्टसने सांगितले कारण आणि उपाय

ग्रीन टी -

ग्रीन टी हे डिटॉक्सिंग ड्रिंक आहे पण रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. ग्रीन टीचे अतिसेवन देखील यकृत आणि पोटाच्या आजारांशी संबंधित आहे. त्यामुळे जर तुम्ही ग्रीन टीचे सेवन करत असाल तर दिवसातून दोनदा ते मर्यादित करण्याचा प्रयत्न करा.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Weight, Weight loss tips