विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 6 एप्रिल: जिल्हातील कळमेश्वर येथील श्रीराम रथ उत्सव सोहळा हा जिल्हासह संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. नागपूर जिल्ह्यातील या रथ यात्रेचे यंदाचे 224 वे वर्ष आहे. येत्या 8 एप्रिलपासून ऐतिहासिक रथोत्सवाला सुरुवात होणार आहे. 8 ते 10 एप्रिल दरम्यान भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने यात्रेची तयारी जोरात सुरू आहे. त्यामुळे शहरात उत्साहपूर्ण वातावरण आहे. रथोत्सवाला 224 वर्षांची परंपरा श्री हरि महाराज मंदिरातर्फे सुमारे 224 वर्षांपासून प्रभू श्री रामचंद्र व श्री हनुमंतांचा रथोत्सव होतो. चैत्र महिन्यातील पौर्णिमेनंतर द्वितीयेला रथयात्रा उत्सवाला प्रारंभ होत असतो. या यात्रेतील प्रभू श्री रामचंद्रांचा रथ पूर्णतः लाकडापासून बनविलेला असून तीन माळ्यांचा कोरीवकलेचा हा एक उत्तम नमुना आहे. या यात्रेत विदर्भ, मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक हजेरी लावतात. कोरोना संक्रमणाचा काळ वगळला तर ही रथयात्रा अखंडितपणे, सातत्याने सुरु आहे.
यंदा 8 एप्रिलपासून सोहळ्यास सुरुवात येत्या 8 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता चौका-चौकात आकर्षक झाक्या, दिंडीसह, ढोल ताशांच्या गजरात शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. 9 वाजता विविध लोकनृत्य, मलखांब, सर्कस, जादूचे प्रयोग असे बहुरंगी कार्यक्रम कळमेश्वर येथे होणार आहेत. रथयात्रे दरम्यान कळमेश्वर येथील शिवस्वराज्य संस्थेच्या वतीने जोडमारुती चौकात दहीहंडी, सामूहिक हनुमान चालीसा पठण इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 9 एप्रिलला विशेष कार्यक्रम 9 एप्रिलला बाजार चौकात सकाळी 8 वाजतापासून दिवसभर जनजागृतिपर कला पथक यांचे दुय्यम गंमतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात शाहीर ज्ञानेश्वर वाघमारे विरुद्ध शाहीर सुरमाताई दर्शन यांचा दुय्यम सामना रंगेल. Ram Navami 2023: श्रीरामाच्या वनवासाशी खास कनेक्शन असलेल्या रामटेक मंदिराचा इतिहास माहिती आहे ? पाहा Video 10 एप्रिलला कीर्तन आणि महाप्रसाद 10 एप्रिलला बाजार चौकात रात्री 6 ते 9 वाजतापर्यंत हभप संतोष महाराज लहाने, आळंदी, जि.पुणे यांचे हरिकीर्तन होईल. दरम्यान, विविध सामाजिक संघटनांकडून महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. पहाटेपर्यंत हा रथोत्सव, भजन, कीर्तन, दिंड्या, पताका, डीजे व विठ्ठल नामाच्या गजरात येथील वातावरण भक्तीमय होऊन जाणार आहे. वर्षातून एकदा येणाऱ्या या रथयात्रेमुळे कळमेश्वरसह तालुक्यातील नागरिकांमध्ये मोठया प्रमाणात नवचैतन्य निर्माण होत असते. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी या ऐतिहासिक रथउत्सवात सहभागी व्हावे, असे आवहन रथ यात्रा उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी महाराष्ट्रातून जाणार लाकूड, वाचा काय आहे खास कारण! अशी आहे आख्यायिका आध्यात्मिक समाधान लाभावे म्हणून सद्गुरू सत्संगाचा लाभ मिळविण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील सेलू घोराड येथील संत केमाजी महाराज दरवर्षी कळमेश्वरची वारी नित्यनेमाने करीत असत. मोहपा येथील सिद्धयोगी परमहंस संत तुकाराम महाराज यांचे मुरहरनाथ जेष्ठ बंधू होत. महाराजांचे मूळ नाव दाजीबा होते. नाथ संपद्रयातील सद्गुरू लिंगनाथ हे सत्पुरुष एदलाबादहून स्वयंप्रेरणेने कळमेश्वर येथे आले होते. सद्गुरू लिंगनाथ यांनी मुरहरनाथांना प्रत्यक्ष साक्षात्कार घडवून दिला. दाजीबांना अनुग्रह दिल्यानंतर सद्गुरू लिंगनाथ कळमेश्वर येथून मोहप्याला आले. तेथे त्यांना अनुग्रह दिला दाजीबा यांनी सद्गुरूच्या उपास्यमूर्तीचा स्वीकार करून मूर्ती कळमेश्वरातील विठ्ठल मंदिरात आणून स्थापन केली. गावाच्या शेजारून वाहणाऱ्या नदीच्या उत्तरेला स्वयंभू कदंबेश्वर शिवमंदिर आहे. कदंबेश्वराचा अपभ्रंश होऊन कळमेश्वर झाले, असे जाणकारांचे मत आहे.