मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भर वर्दळीच्या ठिकाणी 35 वर्षीय महिलेचा खून, गोंदियातील सुरक्षा रामभरोसे? हादरवणारी घटना

भर वर्दळीच्या ठिकाणी 35 वर्षीय महिलेचा खून, गोंदियातील सुरक्षा रामभरोसे? हादरवणारी घटना

गोंदिया जिल्ह्यात भर वर्दळीच्या ठिकाणी 35 वर्षीय महिलेचा खून

गोंदिया जिल्ह्यात भर वर्दळीच्या ठिकाणी 35 वर्षीय महिलेचा खून

गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरात आज संध्याकाळच्या सुमारास जी घटना घडली त्यामुळे खळबळ उडाली आहे. श

    गोंदिया, 17 ऑगस्ट : गोंदिया जिल्हा आज एका धक्कादायक घटनेने हादरला आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरात आज संध्याकाळच्या सुमारास जी घटना घडली त्यामुळे खळबळ उडाली आहे. शहरातील प्रचंड वर्दळ असलेल्या परिसरात एका 35 वर्षीय महिलेचा खून करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भर वर्दळीच्या ठिकाणी एका महिलेची अशाप्रकारे हत्या होत असेल तर शहरातील सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित होताय. आरोपींना पोलिसांचा अजिबात भय राहिलेला नाही, अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. महिलेच्या हत्येनंतर आरोपी पुन्हा तशाचप्रकारचं कृत्य करु शकतात. त्यामुळे पोलिसांनी आरोपींना तातडीने शोधून बेड्या ठोकाव्यात. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. संबंधित घटनेत मृत्यू झालेल्या 35 वर्षीय महिलेचं सशिकला साखरे असं नाव आहे. या महिलेची आरोपींसोबत कोणतीही ओळख नव्हती. आरोपींनी महिलेकडे असलेलं सोनं लुटण्यासाठी तिची हत्या केल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर येत आहे. आरोपींनी महिलेचा खून करुन तिच्या अंगावर असलेले दागिने घेवून ते पसार झाले आहेत. प्रचंड वर्दळ असलेल्या परिसरातच संबंधित घटना घडली. (भूतविद्येच्या नावाखाली मशिदीच्या इमामाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी अटकेत) संबंधित घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनेचं गांभीर्य ओळखत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच तपासाला सुरुवात केली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. नेमकं काय घडलंय याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. पोलीस या घटनेतील आरोपींचा शोध घेत आहेत. त्यासाठी पोलिसांचं पथक कामाला लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेमुळे मृतक सशिकला साखरे यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांचे कुटुंबिय घटनास्थळी दाखल झाले. आपल्या घरातील एका सदस्याची इतक्या वाईट पद्धतीने हत्या करण्यात आल्याचं पाहून कुटुंबियांनी टाहू फोडला. त्यांचा आक्रोश पाहून घटनास्थळी असलेल्या इतर नागरिकांच्या देखील डोळ्यांमध्ये पाणी आलं. या घटनेप्रकरणी जलद गतीने तपास व्हावा आणि आरोपी नराधमांना पकडून फाशीची शिक्षा व्हावी, अशी भावना संतप्त नागरिकांनी व्यक्त केली आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Crime, Murder

    पुढील बातम्या