लखनऊ, 17 ऑगस्ट : देशात सातत्याने बलात्कार, अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका मशिदीतील इमाम याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी नराधम इमाम याला अटक केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - फखरे आलम असे या नराधम इमाम याचे नाव आहे. मोहनलालगंज पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नराधम इमामाने भूतविद्येच्या नावावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. दरम्यान, या घटनेची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांना मिळाल्यावर त्यांनी लगेचच यासंबंधी तक्रार दाखल केली. यानंतर पोलीस तत्काळ कारवाई करत आरोपीला नराधम इमामाला अटक केली आहे. याआधीही एका 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार - दरम्यान, याआधी संभल जिल्ह्यातील एका मशिदीत 6 वर्षाच्या मुलीवरही बलात्कार झाला होता. या घटनेनंतर आरोपी मौलानाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी ओवैस एका मशिदीत मौलवी आहे. संभल पोलीस ठाणे परिसरातील एका महिलेने आरोप केला आहे की, मंगळवारी सकाळी तिच्या सहा वर्षीय मुलीसोबत दीनी तालीम देणाऱ्या औवेस नावाच्या तरुणाने मशिदीजवळील एका खोलीत घेऊन जाऊन बलात्कार केला होता. हेही वाचा - शिक्षक झाला भक्षक! प्रॅक्टिकलच्या नावाखाली 20 वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार, पीडितेचा टोकाचा निर्णय निष्पाप मुलीने सांगितले होते, की इमामने तिच्यासोबत दुष्कर्म केले आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी इमामकडे तक्रार केली तर इमामने संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून आरोपी इमाम उबेस याचा हात असल्याचे सांगून तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून आरोपी ओवेसविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.