नागपूर, 19 जून , उदय तिमांडे : मैदा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या आहारी गेलेल्या मुलाची बापानेच झोपेत हत्या केली आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीप्रमाणे बापाने मुलाची हत्या केली, मात्र ही हत्या नसून मुलानेच आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला, मात्र बनाव उघड झाल्यानं पोलिसांनी बापाला ताब्यात घेतलं आहे. अश्विन रतन शेंडे असं मृत मुलाचं नाव आहे, तर रतन शेंडे असं आरोपी बापाचं नाव आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना मैदा तालुक्यातील बोरगावमधील आहे. दारूच्या नशेत असलेल्या मुलाला तो झोपते असताना बापाने काठीने मारहान केली. त्यानंतर त्याचा गळा आवळून हत्या करण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अश्वीन याला दारूचे व्यसन होते, तो दारू पिऊन वडिलांना मारहाण करायचा. त्या दोघांमध्ये कडाक्याची भांडण होत होते.
बीडमध्ये मोठा अपघात; मुक्ताईच्या पालखीत वाहन घुसलं, वारकरी गंभीर जखमीअश्विन हा नेहमीप्रमाणे दारू पिण्यासाठी तालुक्यातील बोरगावला गेला होता. तो दारू पिऊन एका बंद पानाच्या टपरी जवळ झोपला होता. ही संधी साधून आरोपी रतन याने मुलाला काठीने मारहाण केली. एवढंच नाही तर त्याचा गळा नायलॉनच्या दोरीने आवळून ही हत्या नसून आत्महत्या असल्याचा बनाव देखील रचण्यात आला. मात्र पोलीस तपासात बनाव समोर आल्यानं पोलिसांनी रतन शेंडे याला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान मिळत असलेल्या माहितीप्रमाणे अश्विन हा गेल्या तीन दिवसांपासून वडिलांची गाडी घेऊन जात होता. याचाही राग आरोपीच्या मनात होता. याच वादातून रतन याने आपल्या मुलाची हत्या केली.