यवतमाळ, 22 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. तसेच अपघाताच्याही घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळ येथे खाद्य तेलाचा टँकर पलटी झाल्याची घटना घडली.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
यवतमाळच्या नेर तालुक्यातील मालखेड येथे खाद्यतेलाचा टँकर पलटी झाला. यानंतर तेल घेऊन जाण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहेत. खाली तेल सांडत असल्याचे बघून नागरिकांनी आपल्या घरी तेल नेण्यासाठी एकच गर्दी केली होती. टँकर रस्त्यावर पलटी झाल्याने नेर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, घटना स्थळाचा व्हिडिओही समोर आला आहे.
#यवतमाळ मालखेड येथे खाद्य तेलाचा टँकर पलटी; तेल नेण्यासाठी नागरिकांची झुंबड pic.twitter.com/JrZpbNhsIY
— News18Lokmat (@News18lokmat) January 22, 2023
हेही वाचा - रेल्वे रुळ ओलांडताना इंजीनियरिंगच्या विद्यार्थीनीची एक चूक जीवावर; नागपूरमधील घटना
समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; 1 ठार 3 जखमी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Truck accident, Yawatmal