मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रेल्वे रुळ ओलांडताना इंजीनियरिंगच्या विद्यार्थीनीची एक चूक जीवावर; नागपूरमधील घटना

रेल्वे रुळ ओलांडताना इंजीनियरिंगच्या विद्यार्थीनीची एक चूक जीवावर; नागपूरमधील घटना

मृत विद्यार्थिनी आरती गुरव

मृत विद्यार्थिनी आरती गुरव

आरती गुरव ही बीई प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India
  • Published by:  Khushalkant Dusane

नागपूर, 18 जानेवारी : अनेकदा प्रवास करताना तसेच रस्त्यावर पायी करताना कानात हेडफोन घालून चालतात. मात्र, नागपुरातमध्ये एका तरुणीला कानात हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडणे खूप महागात पडले. रेल्वे रुळ ओलांडत असताना कानात हेडफोन असल्याने रेल्वेचा आवाज तरुणीला आला नाही. त्यामुळे रेल्वे खाली येऊन तिचा मृत्यू झाला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

ही धक्कादायक घटना आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास नागपूरमधील डोंगरगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली. आरती मदन गुरव असे मृत तरुणीचे नाव आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ पथकासह दाखल झाले. यानंतर घटनास्थळी पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तर घटनेचा पुढील तपास ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मृत तरुणी मूळ भंडारा येथील रहिवासी

मृत विद्यार्थिनी आरती गुरव ही मूळची भंडारा जिल्ह्यातील सातोना या गावची निवासी आहे. मात्र, ती हिंगणा तालुक्यातील टाकळघाट येथे मावशीकडे ती वास्तव्याला होती. तसेच आरती गुरव ही डोंगरगाव जवळील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयात बीई प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती.

हेही वाचा - नायलॉन मांजामुळे 11 वर्षाच्या चिमुरड्याने गमावला जीव, नागपुरात नेमकं काय घडलं?

आरती गुरव ही आज सकाळी टाकळघाटवरून गुमगाव रेल्वे स्थानकाजवळ एसटी बसने आली. यानंतर ती पायदळ रेल्वे स्थानकावर रेल्वे फाटक ओलांडून जात होती. तसेच यावेळी आरती मोबाईलवर हेडफोन लावून बोलत चालली होती. याच दरम्यान त्या ट्रॅकवर भरधाव वेगात रेल्वे येत होती.

आजूबाजूच्या लोकांनीही तिला मोठमोठ्याने आवाज दिला. मात्र, हेडफोन कानात असल्याने तिला कुठलाही आवाज आला नाही. अखेर भरधाव आलेल्या पुणे-नागपूर रेल्वेखाली चिरडून तिचा मृत्यू झाला. रेल्वेने तिला तब्बल 50 फूट पर्यंत फरफटत नेले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Death, Railway, Railway accident