नागपूर, 11 डिसेंबर : ‘एका विकृतीपासून सावधान करतो, शॉर्टकटचे राजकारण करू नका. राजकीय स्वार्थासाठी देशाचे पैसे लुटले जात आहे. ही विकृती करदात्यांचे पैसे लुटण्याची आहे. शॉर्टकट वापरणारे राजकीय पक्ष, नेते हे देशाच्या करदात्याचे शत्रू आहे. फक्त खोटी आश्वासनं देऊन त्यांना फक्त सरकार सरकारमध्ये यायचं असतं. असे राजकीय पक्ष देश कधीच बनवू शकत नाही’ असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना फटकारून काढलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूरमध्ये समृद्धी महामार्गच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी मोदींना विरोधकांवर निशाणा साधला. ‘एका विकृतीपासून सावधान करतो, शॉर्टकटचे राजकारण करू नका. राजकीय स्वार्थासाठी देशाचे पैसे लुटले जात आहे. ही विकृती करदात्यांचे पैसे लुटण्याची आहे. शॉर्टकट वापरणारे राजकीय पक्ष, नेते हे देशाच्या करदात्याचे शत्रू आहे. फक्त खोटी आश्वासनं देऊन त्यांना फक्त सरकार सरकारमध्ये यायचं असतं. असे राजकीय पक्ष देश कधीच बनवू शकत नाही. आज अशा काळात भारत पुढील 25 वर्षांच्या कामावर काम करत आहे, पण काही राजकीय पक्ष भारताची अर्थव्यवस्था उद्धवस्त करण्यासाठी लागले आहे, अशी टीका मोदींनी विरोधकांवर केली. (जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत खडसेंना मोठा धक्का, भाजपने मारली बाजी) ‘पहिली औद्योगिक लाट आली होती, त्याचा फायदा भारताला घेता आला नाही. आता चौथी लाट आली आहे, अशी संधी भारत सोडणार नाही. अशी संधी भारताला कधी मिळत नाही. शॉर्टकटने देश चालत नाही. देशाच्या विकासाठी सतत काम करावे लागले. दूरदृष्टीचा विकास गरजेचे असते. इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक देशासाठी महत्त्वाचे आहे. एक काळ होता साऊथ कोरिया गरीब देश होता, पण इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून हा देश पुढे गेला आहे. लाखो भारतीयांना तिथे रोजगार मिळतोय, असंही मोदी म्हणाले. ( पंतप्रधानांनी घेतला ढोल वाजवण्याचा आनंद; पाहा मोदींचा नागपुरातील VIDEO ) शॉर्टकटचे राजकारण करणाऱ्या लोकांना विनंती करतो, देशाच्या विकासाचा विचार करा. स्थायिक विकासाचा विचार करून राजकारण केलं पाहिजे. स्थायिक विकासाचे राजकारण केलं पाहिजे, या बळावर तुम्ही निवडणुका जिंकू शकता. एकदा नाही कित्येक वेळा निवडणुका जिंकू शकतात. शॉर्टकट ऐवजी स्थायी विकासाचा विचार केला पाहिजे घाबरू नका, देशाचे हित समोर ठेवाल तेव्हा शॉर्टकटचे राजकारण तुम्ही दूर ठेवाल असा सल्लाही मोदींनी विरोधकांना दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.