जळगाव, 11 डिसेंबर : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. भाजपा शिंदे गटाचे शेतकरी विकास पॅनलने 20 पैकी 16 जागांवर विजय मिळवला आहे. एकनाथ खडसे यांचे महाविकास आघाडीचे सहकार पॅनलला केवळ 4 जागा मिळाल्या आहे. मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील भाजप आमदार मंगेश चव्हाण शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील दिग्गज नेते विजयी झाले आहे. तर एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सतीश पाटील या दिग्गजांचा दारुण पराभव झाला आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मुक्ताईनगर इथं एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेरीस या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांना पराभवाचा सामना करावा लागला. ( ‘समृद्धी’चं उद्घाटन करणार होतो पण.., अजितदादांनी बोलून दाखवली खंत ) ‘जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत आमच्या सहकार पॅनल चा पराभव झाला. शेतकरी पॅनलचा विजय झाला मी मनापासून शेतकरी पॅनलचे अभिनंदन करतो. दूध संघात पारदर्शक काम करूनही पराभव झाला. खोक्यांचा मोठ्या प्रमाणात वापर निवडणुकीत झाला त्यात आम्ही कमी पडलो. सत्तेचा वापर करण्यात आला. दोन दोन मंत्री पाच पाच आमदार खासदार हे सर्व एका बाजूला होते आणि आमचे पॅनल एका बाजूला होते, असा आरोपही खडसेंनी केला. (चंद्रकांत पाटलांवर शाईफेक प्रकरणी 11 पोलीस कर्मचारी निलंबित) आता निवडून आले चांगला कारभार दूध संघाचा करा. पराभव मतदारांनी दिलेला कौल हा मान्य करायला हवा तो आम्ही मान्य केला. एखाद्या अपयशाने थकणारा माणूस मी नाही, असंही एकनाथ खडसे म्हणाले. दरम्यान, या निवडणुकीत मंगेश चव्हाण हे आघाडीवर होते. त्यामुळे मतदान केंद्रावर आल्यानंतर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांनी मतदार केंद्रातून काढता पाय घेतल्याने चर्चेंना उधाण आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.