नागपूर, 25 ऑक्टोबर : छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकिल्ले यांचे नातं अतूट आहे. या दोन गोष्टीतील समन्वय साधला तरच शिवचरित्र खऱ्या अर्थानं समजते. शिवरायांच्या पराक्रमाचे जीवंत साक्षीदार असलेल्या या किल्ल्यांचा अलौकिक वारसा महाराजांनी आपल्या हाती सुपुर्द केला आहे. या किल्ल्यांचे महत्त्व आणि त्याचा रोमहर्षक इतिहास सर्वांना माहिती व्हावा यासाठी दिवाळी त किल्ले साकारण्याची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. या परंपरेनुसार नागपुरात मंदार उट्टलवार आणि अर्णव उट्टलवार या दोघा भावांनी मिळून आपल्या राहत्या घरीच प्रतापगड किल्ला साकारला आहे. महाराष्ट्र संस्कृतीत गडकोटांना प्राचीन स्थान आणि महत्त्व आहे. पराक्रम आणि संघर्षांची ही प्रतीके आहेत. गडकोटांच्या स्मृती जपाव्यात आणि पूर्वजांच्या पराक्रमाच्या नौबती पुन्हा घडाव्यात जणू यासाठीच किल्ले बनवण्याच्या परंपरेचा उदय झाला असावा. नागपुरातील मंदार उट्टलवार आणि अर्णव उट्टलवार या दोघा भावांनी मिळून आपल्या राहत्या घरी 7 × 10 फुटू लांब आणि 3 फूट उंच असा आकारमान असलेला किल्ले प्रतापगड निर्माण केला आहे. 1 ट्रॅक्टर मातीतून 9 दिवसात साकारला किल्ला दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की आम्ही प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन किल्ल्याचा अभ्यास करतो. त्यासाठी किल्ल्यांचे नकाशे ,पुस्तक, youtub, इत्यादींसह संदर्भ पुस्तकांचे वाचन करून किल्ल्यांचा अभ्यास करतो. मागील 15 वर्षापासून अविरतपणे किल्ले साकारले आहेत. अनेकदा किल्ले स्पर्धेत पारितोषिक देखील मिळाले आहेत. यंदा अफजल खानवधाचा थरार अनुभवलेला आणि शिवरायांच्या बुद्धिमत्ता, राजकारण, रणकारण, शिवप्रताप अनुभवलेला किल्ले प्रतापगड साकारला आहे. हा किल्ला 9 दिवसात साकारला असून या साठी 1 ट्रॅक्टर माती, शाडू माती, रंग, रांगोळी इत्यादी साहित्य लागले असल्याची माहिती मंदार उट्टलवार यांनी दिली. Video : चक्क सोन्याची आहे ‘गोल्डन रॉयल प्लाझा’ मिठाई, पाहताच सुटेल तोंडाला पाणी! दुर्गांच्या प्रतिकृतीतून व्हावा दुर्गांचा जागर बहुतांश किल्ले हे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील मुंबई पुणे नाशिक इत्यादी भागात आहेत. उर्वरित विदर्भात दुर्गांची संख्या अल्प आहे. वयोवृद्ध व अबाल बालक हे प्रत्यक्ष किल्ल्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून या वयातील सर्वांना या दुर्ग प्रतिकृतीतून शिवकाळ अनुभवता यावा व दुर्गांच्या रूपाने शिवछत्रपतींचा इतिहास सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारली आहे. दिवाळी म्हणजे आमच्यासाठी किल्ला आणि किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी राजे हेच समीकरण होऊन बसले असं मंदार उट्टलवार सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.