Nagpur : बारावी सायन्सनंतर 'या' क्षेत्रात करा करिअर; मिळेल लाखोंचा पगार, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Nagpur : बारावी सायन्सनंतर 'या' क्षेत्रात करा करिअर; मिळेल लाखोंचा पगार, जाणून घ्या संपूर्ण माहिती
तुमचं बारावी सायन्स या विषयांतून झालं असेल आणि तुम्हाला सायन्समध्येच पूढे ग्रॅज्युएशन करायचे असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील (Nagpur University) श्री मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालयात बीएससी इन जिओलॉजी अभ्यासक्रम चांगले करिअरची संधी देत आहे.
नागपूर, 22 जून :महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. निकाल तर लागला पण आता पुढे काय? (Career After 12th Science) करिअरमध्ये चांगली भरारी घेण्यासाठी पुढे कोणत्या क्षेत्रात शिक्षण घेणं आवश्यक आहे? असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आले असतील. मात्र इंजिनिअरिंगशिवाय बारावी सायन्सनंतर करिअरच्या अनेक संधी आहेत. यातीलच एक कोर्से म्हणजे बीएससी इन जिओलॉजी (BSc in Geology). या कोर्ससद्वारे तुमचे चांगले करिअर तर घडेलच पण मोठ्या पगाराची नोकरी देखील मिळेल. चला तर मग जाणून घेऊया या कोर्ससबद्दल.
तुमचं बारावी सायन्स या विषयांतून झालं असेल आणि तुम्हाला सायन्समध्येच पूढे ग्रॅज्युएशन करायचे असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील (Nagpur University) श्री मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालयात (Shri Mathuradas Mohota College of Science, Nagpur) बीएससी इन जिओलॉजी अभ्यासक्रम चांगले करिअरची संधी देत आहे. पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, भूगर्भात सापडणारे मिनरल, खनिजे आणि महाकाय डायनासोर त्यांचे रहस्य अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी त्याचा एक अभ्यास असतो. त्याच अभ्यासक्रमाला भूगर्भशास्त्र (earth science) असे म्हणतात. याचा अभ्यास जिओलॉजी कोर्समधून शिकविला जातो. हे वाचा -बारावीचं शिक्षण आर्ट्समधून झालंय? 'या' क्षेत्रांमध्ये करू शकता करिअरतीन वर्षात सहा सेमिस्टरबीएससी इन जिओलॉजी हा तीन वर्षाचा अभ्यासक्रम आहे. या तीन वर्षात जिओलॉजी व त्यातील विविध विषयाचे ज्ञान विस्ताराने दिल्या जाते. तीन वर्षात सहा सेमिस्टर विविध विषयांनुसार विभागून दिले जातात. यात जीवाश्मशास्त्र, रिमोट सेसिंग, मिनेरॉलॉजी, स्ट्रचरल गेओलॉजी, अशा अनेक विषयांवर विस्ताराने शिक्षण दिले जाते.कोणाला मिळणार प्रवेश ?बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्री मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालयात बीएस्सी इन जिओलॉजी या कोर्सला प्रवेश मिळवता येतो. बारावीत गणित किंवा जीवशास्त्र हे विषय नसले तरीही विद्यार्थी प्रवेश घेवू शकतात.वाचा :MH BOARD SSC RESULT: निकाल तर लागला! पण आता पुढे काय? ‘हे’ आहेत 10वी नंतरचे बेस्ट करिअर ऑप्शन्सफिस आणि प्रवेश प्रकियाराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या श्री मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालयातील जिओलॉजी विभागाच्या अभ्यासक्रमाची फी ही केवळ तीन ते पाच हजाराच्या आताच आहे. विद्यापीठाच्या https://mohotasci.edu.in/ या वेबसाईटवर किंवा आपण संबंधित कागदपत्रे घेवून थेट विद्यालयात जाऊन देखील प्रवेश घेवू शकतो.
गुगल मॅपवरून साभार
कोर्स पूर्ण झाल्यावर मिळेल लाखोंचा पगारहा तीन वर्षे कोर्स पूर्ण केल्यानंतर अनेक शासकीय तथा प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरीच्या संधी मिळू शकतात. जर एखाद्या विद्यार्थ्यांने मास्टर्स इन गेओलॉजी हा मास्टर्स कोर्स केल्यास केंद् व राज्य सरकारच्या अनेक संशोधन केंद्र जसे खनिकर्म विभाग, भूगर्भ विभाग, डब्लू सी एल (WCL) ह्यात नोकरीच्या अनेक संधी प्राप्त होऊ शकतात. देशात अनेक सरकारी व प्रायव्हेट कंपन्यादेखील या जिओलॉजी विद्यार्थ्यांची मागणी करीत असतात आणि दरमहा त्यांना 60 ते एक लाखापर्यंत पगारही दिला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.