बारावीचं शिक्षण आर्ट्समधून झालंय? आता पुढे काय? 'या' क्षेत्रांमध्ये करू शकता करिअर

बारावीचं शिक्षण आर्ट्समधून झालंय? आता पुढे काय? 'या' क्षेत्रांमध्ये करू शकता करिअर

चला तर मग जाणून घेऊया आर्ट्समधील करिअरच्या संधींबद्दल.

  • Share this:

मुंबई, 20 जून : दहावी आणि बारावीची परीक्षा (10th and 12th exam) म्हंटलं की विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना अक्षरशः धडकी भरते. कोरोना काळामुळे  (Exams in Corona)यावर्षी परीक्षा झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांचं परीक्षांचं टेन्शन गेलं मात्र आता खरी परीक्षा सुरु होणार आहे. ती परीक्षा म्हणजे करिअरची निवड (How to choose Career wisely). बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडे आता बारावीतील स्ट्रीमशी निगडित करिअर निवडणं हाच एक पर्याय बाकी आहे. त्यात आर्ट्समध्ये (career after 12th Arts) असलेले विद्यार्थी अभ्यासात 'ढ' असा समज आहे. पण असं अजिबात नाही. बारावीनंतर आर्ट्समध्ये करिअरच्या अनेक संधी आहेत. तसंच चांगल्या गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया आर्ट्समधील करिअरच्या संधींबद्दल. (career after 12th arts)

आर्ट्स या स्ट्रीममध्ये विद्यार्थ्यांना इतिहास, भाषा, संस्कृती, तत्वज्ञान आणि सामाजिक ज्ञान या सर्व बाबींबद्दल ज्ञान मिळतं. तसंच विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात आपले छंद जोपासण्याचंही ज्ञान मिळतं. त्यामुळे हे विद्यार्थी सर्वगुणसंपन्न असतात.

हे वाचा - Indian Railway Recruitment 2021: तब्बल 3591 जागांसाठी पदभरती; आताच करा अर्ज

या क्षेत्रात करू शकता ग्रॅज्युएशन (graduation)

बॅचलर ऑफ आर्ट्स (Bachelor of Arts B.A.)

बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स (Bachelor of Fine Arts B.F.A.)

बॅचलर ऑफ बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन  (Bachelor of Business Administration B.B.A.)

लॉ (कायद्याचं) शिक्षण (B.A L.L.B)

बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग (Bachelor of Fashion Design B.F.D.)

बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (Bachelor of Hotel Management B.H.M.)

बॅचलर इन जर्नलीजम अँड मास कम्युनिकेशन (पत्रकारिता) (Bachelor of Journalism and Mass Communication)

असे एक ना अनेक कोर्सेस बारावी आर्ट्सनंतर उप्लब्ध आहेत, त्यामुळे तुमची आवड कोणत्या क्षेत्रात आहे ठरवूनच प्रवेश घ्या.

Published by: Atharva Mahankal
First published: June 20, 2021, 6:05 PM IST
Tags: careerJobs

ताज्या बातम्या