Home /News /maharashtra /

भंडारा शहरात दिवसा ढवळ्या हत्येचा थरार, चार जण आले, वाद घातला, आणि...., जिल्हा हादरला

भंडारा शहरात दिवसा ढवळ्या हत्येचा थरार, चार जण आले, वाद घातला, आणि...., जिल्हा हादरला

मृतक आणि आरोपींचा फोटो

मृतक आणि आरोपींचा फोटो

भंडारा शहरात आज भर दिवसा एक धक्कादायक घटना घडली आहे. चार तरुणांनी मिळून एका 40 वर्षीय बांधकाम ठेकेदाराची निर्घृणपणे हत्या केली आहे.

    नेहाल भुरे, भंडारा, 4 जुलै : भंडारा शहरात आज भर दिवसा एक धक्कादायक घटना घडली आहे. चार तरुणांनी मिळून एका 40 वर्षीय बांधकाम ठेकेदाराची निर्घृणपणे हत्या केली आहे. या हत्येच्या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. आरोपींनी जुन्या भांडणाच्या रागातून ठेकेदाराची हत्या केली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. पण दोन आरोपी अजूनही फरार आहेत. पोलीस त्यांचादेखील शोध घेत आहेत. पण या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही भंडारा शहरात मेंढा येथील चर्च रोडवर नाल्याजवळ घडली आहे. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडून 2 फरार आरोपींचा शोध सुरु आहे. ओमप्रकाश मेश्राम असं 40 वर्षीय मृतक ठेकेदाराचं नाव आहे. क्रिष्णा चापरे (वय 24 वर्ष), राकेश मंदुरकर (वय 25 वर्ष) असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यात दोन आरोपी फरार आहेत. मृतक ओमप्रकाश यांचे आरोपींसोबत जुन्या एका प्रकरणामुळे वाद सुरु होता. दोघेही एकमेकांना पाण्यात बघत होते. दरम्यान आज दुपारी ओमप्रकाश आपल्या मेंढा येथील बांधकाम साईडवर व्यस्त असताना आरोपी क्रिष्णा आणि राकेश आपल्या दोन मित्रांसोबत आले. यावेळी त्यांनी मृतक ओमप्रकाशसोबत भांडण केले. यात वाद इतका विकोपाला गेला की क्रिष्णा आणि राकेशने बांधकामात वापर होणाऱ्या फावड्याने ओमप्रकाश यांच्यावर सपासप वार केले. (1 कोटी 17 लाखांची कागदपत्रं आणि कोडवर्ड, संजय राऊतांचा उत्तर द्यायला नकार, ईडीच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे) आरोपी ओमप्रकाश यांच्यावर वार करुन घटनास्थळावरुन पळून गेले. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या ओमप्रकाश यांना लागलीच त्यांच्या कामावरिल मजूरांनी दवाखान्यात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच प्रकरण समजून घेतलं. पोलिसांनी या प्रकरणी जलद गतीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील 2 आरोपी फरार आहेत. पोलीस त्या आरोपींचादेखील शोध घेत आहेत. दरम्यान या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Bhandara Gondiya, Crime, Murder

    पुढील बातम्या