मुंबई, 4 ऑगस्ट : शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राऊतांची आज ईडी कोठडी संपणार म्हणून ईडीने त्यांना आज पुन्हा PMLA कोर्टामध्ये हजर केलं. यावेळी ईडीने संजय राऊत यांच्याबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. ईडीने दिलेल्या रिपोर्टमध्ये महत्त्वाची माहिती नमूद केली आहे. ईडीला राऊतांच्या घरातून तब्बल 1 कोटी 17 लाख रुपये हिशोबाचे कागदपत्रे मिळाली आहेत. ही कागदपत्रे ईडीने जप्त केली आहेत. खरंतर ही कागदपत्रे म्हणजे एक डायरीच आहे. या डायरीत कोडींगमध्ये कुणाला पैसे दिले याविषयी माहिती असल्याचा संशय ईडीला आहे. याबाबत संजय राऊत आणि त्यांच्या निकटवर्तीयांना विचारलं असता त्यांनी याविषयी काहीच माहिती दिलेली नाही, अशी माहिती ईडीने कोर्टात दिली. ‘एबीपी माझा’ने याबाबतचं वृत्त प्रदर्शित केलं आहे. संजय राऊत यांच्याविरोधातील पुरावे त्यांच्याच घरातून सापडले, असा दावा ईडीने कोर्टात केला. राऊतांच्या घरातून एक डायरी ईडी अधिकाऱ्यांना मिळाली. ही डायरी राऊतांच्या रुममध्ये होती. या डायरीत कोडवर्डमध्ये 1 कोटी 17 लाख रुपये पैसे दिले गेले असा उल्लेख करण्यात आला आहे. हे लोकं कोण आहेत, एवढी मोठी रक्कम कुणाला दिली याबाबत संजय राऊत आणि त्यांच्या निकटवर्तीयांना प्रश्न विचारला असता त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. त्यामुळे ईडीने आजच्या रिमांडमध्ये सुद्धा 1 कोटी 17 लाख रुपये मिळवण्याचा उल्लेख डिमांड रिपोर्टमध्ये केला होता. ( संजय राऊत आणि त्या ‘व्यक्ती’ची एकत्र चौकशी, ED ने नाव गुप्त ठेवल्याने सस्पेन्स! ) डायरी खूप महत्त्वाची आहे. पैसे पत्राचाळ घोटाळ्यातून मिळाले होते ते पैसे कॅशच्या रुपातून देण्यात आले. ते पैसे संजय राऊत यांच्या जवळच्या व्यक्तींना नावावर देण्यात आले. त्यांची नावे कुणाला कळू नये यासाठी ते कोडींग लँग्वेजमध्ये लिहिण्यात आले, असा ईडीला संशय आहे. ईडीने हे कागदपत्रे जप्त केली आहेत. त्या डायरीच्या माध्यमातून ईडी संबंधित लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. या 1 कोटी 17 लाख व्यतिरिक्त आणखी 3 कोटी रुपये कॅशचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्याप्रकरणी देखील ईडी तपास करत आहे, अशी माहिती ईडीने दिली आहे. ईडी वर्षा राऊतांची देखील चौकशी करणार दरम्यान, ईडी आता संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीदेखील चौकशी करणार आहे. ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावले आहेत. या समन्सनुसार वर्षा यांना पुढच्या आठवड्यात ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. ‘काही संशयास्पद कागदपत्र जप्त केली होती, ही कागदपत्रं पैशांच्या बाबतीत आहेत, पण याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचं संजय राऊत सांगत आहेत. राऊत आधीच्या चौकशीत ज्या आर्थिक व्यवहारांबाबत नकार देत होते, त्याची कागदपत्र त्यांच्या घरात झडतीदरम्यान सापडली आहेत. या कागदपत्रांमधून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातून काही व्यक्तींना मोठी रक्कम पाठवली गेली आहे. खूप मोठ्या रकमेचे हे व्यवहार आहेत. जवळपास 1 कोटी 8 लाख रुपयांची ही रक्कम आहे. वर्षा राऊत यांच्या खात्यात 1 कोटी 8 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत,’ असा आरोप इडीच्या वकिलांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.