मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तेव्हाच महिलेला मुख्यमंत्रिपदाची संधी द्यायला हवी होती; निदान..., बच्चू कडू यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

तेव्हाच महिलेला मुख्यमंत्रिपदाची संधी द्यायला हवी होती; निदान..., बच्चू कडू यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

बच्चू कडू

बच्चू कडू

आपन महिलेला मुख्यमंत्रिपदाची संधी देणार असल्याची मोठी घोषणा उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच केली आहे. यावरून आता शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ajay Deshpande

मुंबई, 4 डिसेंबर :  आपन महिलेला मुख्यमंत्रिपदाची संधी देणार असल्याची मोठी घोषणा उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच केली आहे. यावरून आता शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांना काहीच जमत नाही म्हणून त्यांनी हा नवा उपक्रम सुरू केला आहे. तेव्हाच महिलेला मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं, ते तुमच्यासाठी बरं राहिलं असतं, अशी टीका बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

नेमकं काय म्हटलं बच्चू कडू यांनी? 

बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी एक मोठी घोषणा केली होती. राज्याचा पुढचा मुख्यमंत्री महिला असेल, आपन महिलेला मुख्यमंत्रिपदाची संधी देऊ असं त्यांनी म्हटलं होतं. यावरून बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांना काहीच जमत नाही म्हणून त्यांनी हा नवा उपक्रम सुरू केला आहे. तेव्हाच महिलेला मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं, ते तुमच्यासाठी बरं राहिलं असतं, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.

हेही वाचा :  मंत्रिपद गेलं खड्ड्यात आम्ही त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर संताप

चर्चेला उधाण 

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी राज्याचा पुढील मुख्यमंत्री ्महिला असेल असे संकेत देताच चर्चेला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीमध्ये कोणाला संधी मिळेल. मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल की इतर पक्षाचा अशी चर्चा सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे.

First published:

Tags: Uddhav Thackeray