मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शरम असती तर त्यांनी ..., आदित्य ठाकरेंचा पुन्हा शिंदे गटावर हल्लाबोल; मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी

शरम असती तर त्यांनी ..., आदित्य ठाकरेंचा पुन्हा शिंदे गटावर हल्लाबोल; मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी

ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

नागपूर, 28 डिसेंबर : ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मंत्र्यांवर केवळ भ्रष्टाचाराचे आरोपच झाले नाहीत, तर पुरावे सुद्धा आहेत. सर्व कागदपत्रं जनतेसमोर आहेत. हे सरकार अनैतिक आहे, काही शरम नाही असती तर त्यांनी मंत्र्यांचे राजीनामे घेतले असते. हे सरकार घटनाबाह्य आहे. गद्दार लोक नेते बनले आहेत. स्वत:ला खेके आणि महाराष्ट्राला धोके असं हे सगळं सुरू असल्याचा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला आहे.  

नेमकं काय म्हटलं आदित्य ठाकरे यांनी? 

आदित्य ठाकरे यांनी शिंदे, फडणवीस सरकावर जोरदार निशाणा साधला आहे. हे सरकारच घनाबाह्य असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. स्वत:ला खेके आणि महाराष्ट्राला धोके असं हे सगळं सुरू आहे. रोज नवा घोटाळा समोर येत आहे. गद्दारांच्या गोटातून हे घोटाळे बाहेर येत आहेत. चाळीस गद्दारांमधून जे मंत्री बनले आहेत त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे. परंतु त्यांच्यामध्ये राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आता आदित्य ठाकरे यांच्या टीकेला शिंदे गट काय उत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :  ठरलं! हिवाळी अधिवेशनाचं सूप 30 डिसेंबरलाच वाजणार

संजय राऊतांचा निशाणा  

दरम्यान दुसरीकडे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. एकाच प्रकारच्या मंत्र्यांची प्रकरणं बाहेर येत आहेत, काही लोक म्हणतात बॉम्ब कधी फुटणार? बॉम्ब फुटायला सुरुवात झाली आहे, असा इशारा संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

First published:
top videos

    Tags: Winter session