नागपूर, 22 मे : शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. विदर्भात येऊ घातलेल्या अजनी वन, कोराडी वीज प्रकल्प तसंच कोल वॉशरीच्या प्रकल्पांवरून आदित्य ठाकरेंनी पर्यावरणाबाबत चिंता व्यक्त केली. या प्रकल्पांना विरोध करणाऱ्या पर्यावरणवाद्यांनी आदित्य ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत संवाद साधला. नागपूरच्या अजनी येथे होणाऱ्या मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हबला काही पर्यावरणवादी विरोध करत आहेत, त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे यांची बैठक झाली.
नागपुरात महत्त्वाच्या विषयामध्ये कोराडी प्रकल्प विस्ताराचा विषय आहेच. नांदगाव वारेगावला येऊन गेलो होतो. पुन्हा राखेची साठवणूक सुरू होत आहे. कोल कॉल वॉशरीज विदर्भात वाढत चालली आहे. मी पर्यावरणमंत्री असताना हे थांबवलं होतं. नागपुरातील अजनी वनचा विषय आहे, आम्ही महाविकासआघाडी सरकार असताना अजनी वनला स्थगिती दिली होती, पण आता मल्टी मॉडेलच्या नावाखाली वन संपवलं जाईल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
युतीची सत्ता आल्यास मुंबईत कोणाचा महापौर? शंभूराज देसाईंनी स्पष्टच सांगितलं
राज्याच्या वेगवेगळ्या भागातले सहा औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प बंद करून कोराडीमध्ये 660 मेगावॅटचे दोन प्रकल्प आणले जात आहेत. जी लोकेशन बंद होत आहेत, तिथले रोजगार जाणार आहेत, त्याचं काय? सगळे युनिट एकाच ठिकाणी आणून स्थानिकांचं जीवन अधिक खालावणार आहे. स्थानिकांचे जीव धोक्यात टाकायचे आहेत का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.
सरपंचाची पॉवर प्लांटची मागणी
आदित्य ठाकरे नांदगाव मधील कॉल वाशरी आणि औष्णिक विद्युत केंद्रला विरोध म्हणून स्थानिक रहिवाशांशी संवाद साधत होते, तेव्हा स्थानिक सरपंचाने गावात पॉवर प्लांट टाकण्याची मागणी केली. यानंतर सरपंचाला रोजगार हवा म्हणून मागणी केली, अशी सारवासारव आदित्य ठाकरेंनी केली.
आदित्य ठाकरेंनी नागपूर जिल्ह्यातील नांदगावला भेट दिली आणि कोराडी येथे नवीन होऊ घातलेल्या औष्णिक पॉवर प्लांटला विरोध केला, पण नांदगावचे सरपंच मिलिंद देशभ्रतार यांनी मात्र हा प्लांट आमच्या गावात व्हावा, जेणेकरून रोजकार मिळेल, अशी भूमिका घेतली. त्यामुळे कोराडी येथील नव्या पॉवर प्लांटचा विरोध म्हणून आधित्य ठाकरे नांदगावला गेले असले, तरी नांदगावचे सरपंच मात्र प्लांटचं समर्थन करताना दिसले. सरपंच मिलिंद देशभ्रतार यांनी आदित्य ठाकरेंकडे प्लांट नांदगावात व्हावा, अशी मागणी केली.
...तर राऊत अंडासेलमध्ये दिसले असते; शिरसाटांचं पुन्हा वादग्रस्त विधान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aaditya Thackeray, Shivsena