छत्रपती संभाजीनगर, 22 मे : शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. आज जयंत पाटील चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले. यावेळी राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट यांनी म्हटलं की, ईडीचा वापर केला असता तर अनेक लोक तुरुंगात भेटले असते. ईडी आमच्या इच्छेप्रमाणे वागली असती तर आता संजय राऊत हे अंडासेलमध्ये असते, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटलं शिरसाट यांनी?
ईडीची नोटीस हा काही नवीन भाग नाही, राज ठाकरे यांच्यापासून ते शरद पवारांपर्यंत नोटीस आली आहे. ते ईडीच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी कार्यालयात हजर झाले. मात्र आता शक्तिप्रदर्शन करण्याचा नवा पॅटर्न आल्याचं म्हणत त्यांनी जयंत पाटील यांना टोला लगावला आहे. दुसरीकडे यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ईडीचा वापर केला असता तर अनेक लोक तुरुंगात भेटले असते. ईडी आमच्या इच्छेप्रमाणे वागली असती तर आता संजय राऊत हे अंडासेलमध्ये असते असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरेंना टोला
दरम्यान आदित्य ठाकरे हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपूरमध्ये आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरवरून देखील शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे, आनंदाची बाब आहे, कोणतरी भावी मुख्यमंत्री म्हणतंय. बॅनर लावल्यानं जर मुख्यमंत्री बनता आलं असतं तर मी माझे बॅनर सर्व शहरात लावले असते असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Sanjay raut, Shiv sena