मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नागपूर : खेळता-खेळताच जीव गमावला; क्षणभराचा आनंद 5 वर्षीय रियांशच्या जीवावर बेतला

नागपूर : खेळता-खेळताच जीव गमावला; क्षणभराचा आनंद 5 वर्षीय रियांशच्या जीवावर बेतला

हा मुलगा घराच्या अंगणात असलेल्या स्लायडिंग गेटवर खेळत होता. अंगणातील गेटवर झुलताना ही घटना घडली. यात रियांश टांगले नावाच्या पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India
  • Published by:  Kiran Pharate

नागपूर 14 नोव्हेंबर : लहान मुलं अनेकदा नकळतपणे असे खेळ खेळतात जे त्यांच्या जीवावरही बेततात. बऱ्याचदा घरच्यांना याची पुसटशी कल्पनाही नसते की त्यांचं मुल स्वतःहून मृत्यूच्या दारात जात आहे आणि क्षणात विपरित काहीतरी घडतं. नागपूरमधून एक अशीच अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. यात गेटचा नट निघाल्याने एका चिमुकल्याचा जीव गेला आहे.

उकळत्या वरणात पडून 5 वर्षीय बालकाचा मृत्यू; औरंगाबादमधील मन हेलावणारी घटना

हा मुलगा घराच्या अंगणात असलेल्या स्लायडिंग गेटवर खेळत होता. अंगणातील गेटवर झुलताना ही घटना घडली. यात रियांश टांगले नावाच्या पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. गेटवर झुलताना गेटचा लोखंडी नट निघाला. यामुळे गेट अंगावर पडल्याने रियांश गंभीर जखमी झाला. यानंतर तात्काळ उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मेयो रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी रियांशला मृत घोषित केलं. या दुर्दैवी घटनेमुळे टांगले कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तर या घटनेमुळे परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना कळमना पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे.

मांजर समजून बिबट्या पाळला, मरणासन्न अवस्था झाल्यावर समजलं आणि आता...

उकळत्या वरणात पडून मृत्यू -

औरंगाबादमधूनही एक अशीच मन हेलावणारी घटना शनिवारी समोर आली होती. यात उकळत्या वरणात पडून 5 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. उकळलेल्या वरणाच्या भांड्यात पडल्याने हा चिमुकला गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरु असतानाच या 5 वर्षीय चिमुकल्याचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. योगीराज नारायण आकोदे असं या चिमुकल्याचं नाव होतं.

First published:

Tags: Nagpur News, Shocking news