जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मांजर समजून बिबट्या पाळला, मरणासन्न अवस्था झाल्यावर समजलं आणि आता...

मांजर समजून बिबट्या पाळला, मरणासन्न अवस्था झाल्यावर समजलं आणि आता...

 रेस्क्यू फाउंडेशनच्या ताब्यात चुटकी आल्यावर तिला लगेच हॅास्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. तिथून चुटकीवर उपचार सुरू झाले

रेस्क्यू फाउंडेशनच्या ताब्यात चुटकी आल्यावर तिला लगेच हॅास्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. तिथून चुटकीवर उपचार सुरू झाले

रेस्क्यू फाउंडेशनच्या ताब्यात चुटकी आल्यावर तिला लगेच हॅास्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. तिथून चुटकीवर उपचार सुरू झाले

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 12 नोव्हेंबर : नाशिकच्या मालेगाव भागात मांजर समजून बिबट्याचं पिल्लू एका ग्रामस्थाने पाळला होता. या पिल्लांची अवस्था मरणासन्न असल्याने या व्यक्तीला मांजर आणि बिबट्या यातला फरक समजला नाही. त्याने या पिल्लांला मांजराप्रमाणे सांभाळायचा प्रयत्न केला पण त्याची तब्येत बिघडत चालली होती. अखेर मरणासन्न अवस्थेत नाशिक वन विभागाकडे हे पिल्लू आल्यानंतर ते पुण्यातल्या रेसक्यू फाऊंडेशन कडे आलं. त्यांनी महिन्याभरातच या पिल्लावर उपचार केले आणि पाच महिन्यात हे पिल्लू ठणठणीत बरं झालंय. चुटकी असं मादी बिबट्याचं नाव ठेवण्यात आलं आहे. सहा महिन्यांपूर्वी मरणासन्न अवस्थेत ती मालेगावच्या ग्रामीण भागात मिळून आली होती. तिची तब्येत अत्यंत खराब होती इतकी की, ती जगेल की नाही अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र तिला नाशिक वनविभाग आणि इको या संस्थेच्या माध्यमातून पुण्याच्या रेस्कयू फाऊंडेशनकडे सुपूर्द करण्यात आलंय. (रस्ता ओलांडताना दुचाकीच्या चाकात अडकलं माकड, पुढे काय घडलं पाहा Video) रेस्क्यू फाउंडेशनच्या ताब्यात चुटकी आल्यावर तिला लगेच हॅास्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. तिथून चुटकीवर उपचार सुरू झाले. तिच्यासारखचे आईपासून हरवलेल आणखी एक बिबट्याचं पिल्लू रेस्कयू फाऊंडेशन सांभाळतंय. शक्यता म्हणून त्याचा रक्तगट तपासला असता तो आणि चुटकीचा रक्तगट एकच आला. मग डॅाक्टारांनी त्या पिल्लाचं रक्त चुटकीला दिलं. हळूहळू चुटकीची तब्येत सुधारली आणि आता पाच महिन्यांनंतर चुटकी तिच्या पिंजऱ्यात जोरदार दंगामस्ती करतेय. (काय सांगता! पक्षांचाही होतो Breakup? कारण जाणून वाटेल आश्चर्य) चुटकीचा मांजर म्हणून सांभाळ करण्यापासून ते पुन्हा खेळण्या बागडण्यापर्यंत झालेला प्रवास हा जबरदस्त आहे. एक क्षण असा होता की, सगळ्यांनी चुटकी जगण्याची शक्यता सोडली होती. पण शेवटी .. देव तारी त्याला कोण मारी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात