नागपूर, 15 जुलै : मागच्या चार दिवसांपासून राज्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. दरम्यान विदर्भात यंदा पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील देवळी(खुर्द) येथील मामा तलाव फुटला आहे. हा तलाव नागपूर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असल्याने नागपूर जिल्ह्यातील अनेक गावांना हा तलाव पाणी पुरवतो. (Nagpur Rain Update)
नागपुरात जिल्ह्यात झालेल्या पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना हलवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान नागपुरातील मामा तलावाची भिंत फुटल्याने तलावाचे पाणी आजूबाजूच्या शेतात शिरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेकडो हेक्चर शेत जमीन खरडून गेली आहे. शेतकऱ्यांचे खरिप पीक पूर्णपणे वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे.
हे ही वाचा : Rain Update: थोडी कळ सोसा; 2 दिवसानंतर राज्यात पाऊस घेणार विश्रांती; पुणे वेधशाळेने वर्तवला अंदाज
मामा तलावाला लागून एक ओढा आहे त्या ओढ्याच्या महापुराने तलावाच्या भिंतीला तडे गेल्याची अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये कोणती जिवीत हाणी झाली आहे का याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.
विदर्भात जोरदार पावसाची शक्यता
दरम्यान आजही नागपूरसह पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांना प्रशासनाने ऑरेंज अलर्ट (Orange Alert in Nagpur) दिला आहेत. त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आधीच या भागात पूर परिस्थिती कायम असताना थोड्या पावसाने परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी महत्त्वाचं काम असेल तेव्हाच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे.
हे ही वाचा : नवी मुंबईत शिवसेनेला पुन्हा धक्का; आणखी 5 नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सामील
गुजरात आणि महाराष्ट्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. गुजरातच्या अनेक भागात विशेषतः उत्तर, दक्षिण आणि सौराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. संततधार पावसामुळे पूर्णा आणि अंबिका नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नवसारी शहराशिवाय बिलीमोरा आणि अन्य भागात गुडघाभर पाणी आहे. वांसदा तालुक्यात गेल्या २४ तासांत सकाळी ८ वाजेपर्यंत ३९४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.