मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /उपराजधानी हादरली! नागपुरात प्रियकरासमोरच अल्पवयीन मुलीवर तिघांकडून गॅंगरेप

उपराजधानी हादरली! नागपुरात प्रियकरासमोरच अल्पवयीन मुलीवर तिघांकडून गॅंगरेप

जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

नागपूर, 29 सप्टेंबर: राज्याची उपराजधानी असलेलं नागपूर शहर अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनं हादरलं आहे. शहरातील जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीवर महिनाभरापूर्वी सामूहिक बलात्कार करणाऱ्या चार आरोपींवर जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यश मेश्राम, अमित बोलके, अभिनेश देशभ्रतार आणि रितिक मोहरले अशी आरोपींची नावं आहेत.

हेही वाचा...ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या अडचणीत वाढ, पुणे कोर्टानं फेटाळला जामीन

मिळालेली माहिती अशी की, आरोपी यश मेश्राम हा पीडित मुलीच्या घराजवळ राहातो. यश यानं पीडितेशी मैत्री केली होती. या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं होतं. आरोपी यश यानं 25 ऑगस्टच्या सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास पीडित मुलीला फिरून येऊ असं सांगितलं. पीडितेनं होकार दिल्यानंतर यश आणि पीडिता दुचाकीनं नारा गावाजवळच्या गंगोत्री लॉनजवळ गेले. तिथं त्या दोघांमध्ये शरीरसंबंध प्रस्थापित केले. दोघे 'त्या' अवस्थेत असताना तिथे आरोपी अभिनेश देशभ्रतार, अमित बोलके आणि रितिक मोहरले पोहोचले. त्यांनी पीडितेला शरीरसुखाची मागणी केली. मात्र, पीडितेनं नकार देताच तिला जीवे ठार मारू, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी पीडितेवर तिच्या प्रियकरासमोरच सामुहिक बलात्कार केला.

अत्यंत संवेदनशील घटना- पोलिस आयुक्त

नागपूर शहरातील जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची घटना अत्यंत संवेदनशील आहे. आरोपीना पकडण्याची कारवाई सुरू झाली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.

सामूहिक बलात्कार करून 19 वर्षीय तरुणीची जीभ कापली

दरम्यान, उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 15 दिवसांपूर्वी एका 19 वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार झाला होता. त्यानंतर या नराधमांनी पीडितेचा जीभ कापली, गंभीर अवस्थेत असलेल्या या तरुणीवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र मंगळवारी पीडितेचे निधन झाले.

गंभीर जखमी पीडित तरुणीला आधी अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. नंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे लक्षात घेऊन दिल्लीतील एम्सला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 15 दिवसांपूर्वी हाथरसमध्ये सामूहिक बलात्काराची ही घटना घडली होती. यापूर्वी आरोपींनी पीडितेचा गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पीडितेने स्वत: ला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावर आरोपींनी तरुणीची जीभ कापली होती. गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या तरुणीवर एम्समध्ये उपचार सुरू होते, मात्र या पीडितेला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.

हेही वाचा...वहिनीला कंटाळून दीर पोहचला कोर्टात, म्हणाला-घाणेरडे VIDEO दाखवून...

चारा आणण्यासाठी गेलेल्या तरुणीवर चौघांकडून बलात्कार

हाथरसच्या चांदपा भागात आईसह चारा आणण्यासाठी गेलेल्या तरूणीवर गावातीलच 4 नराधमांनी बलात्कार केला होता. त्यानंतर त्यांनी तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीच्या किंचाळ्यामुळे नराधम पळून गेले. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गंभीर जखमी मुलीला अलीगडच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. यापूर्वी हाथरसचे पोलीस अधीक्षक विक्रम वीर यांनी सांगितले होते की 14 सप्टेंबर रोजी झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Nagpur, Nirbhaya gang rape case, Rape case, Up crime news