Home /News /crime /

वहिनीला कंटाळून दीर पोहचला कोर्टात, म्हणाला-घाणेरडे VIDEO दाखवून...

वहिनीला कंटाळून दीर पोहचला कोर्टात, म्हणाला-घाणेरडे VIDEO दाखवून...

उत्तर प्रदेशमधील अलिगडमध्ये पुन्हा एकदा कुटुंब आणि नातेवाइकांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

    अलिगड, 29 सप्टेंबर : उत्तर प्रदेशमधील अलिगडमध्ये पुन्हा एकदा कुटुंब आणि नातेवाइकांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. इथं एक दीर आपल्या वहिनीला कंटाळून कोर्टात पोहचला आहे. दिराचा आरोप आहे की, वहिनी अश्लील व्हिडीओ दाखवून शारीरिक संबंध केल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे वहिनीविरोधात दीर कोर्टात पोहचला आहे. दरम्यान, याआधी त्यानं पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांची तक्रार नोंदवण्यात आली नाही. दिरानं असा आरोप केला आहे की, वहिनेने त्याला धमकीकी दिली होती, की कोणाला याबाबत कळले तर जीव घेईन. यानंतर पीडित तरुणाने न्यायासाठी कायद्याचा वापर करणे योग्य मानले. कोर्टाच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. वाचा-धक्कादायक! मुलाच्या एका निर्णयामुळे आई-बापाचा गेला जीव; राहत्या घरात घेतला गळफास हे प्रकरण अलिगडच्या बन्नादेवी क्षेत्रातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इथं स्थायिक एका दिरानं वहिनीवर आरोप करत न्याय मागितला आहे. पीडित तरुणाने आरोप पत्रात म्हटले आहे की, त्याच्या वहिनीने त्याला अश्लील व्हिडीओ दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध बनवण्यास दबाव आणला आहे. वाचा-पुण्यात महिला डॉक्टरचा विनयभंग, जम्बो कोविड हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार लैंगिक अत्याचाराप्रकरणी पीडित तरुणाने अनेक वेळा पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र गुन्हा नोंदवण्यात आला नाही. त्यामुळे यावेळी त्यानं थेट कोर्टाचे दार ठोठावले आहे. तक्रार पत्राची दखल घेत कोर्टाने तातडीने पोलीस स्टेशनला तपास करून गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले. यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या