यापुढे कमरखालचेच वार, औरंगाबादमध्ये भाजप नेत्याच्या घरावर दगडफेक करत कार फोडली

यापुढे कमरखालचेच वार, औरंगाबादमध्ये भाजप नेत्याच्या घरावर दगडफेक करत कार फोडली

आज संध्याकाळी भागवत कराड यांच्या घरावर दुचाकीवर आलेल्या 8 ते 10 जणांनी अचानकपणे दगडफेक केली

  • Share this:

औरंगाबाद, 21 फेब्रुवारी : औरंगाबादमध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी महापौर आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भागवत कराड यांच्या घरामध्ये उभ्या कारची अज्ञातांनी तोडफोड केली. घरावर अज्ञात हल्लेखोरांनी तुफान दगडफेक केली. परंतु, हा हल्ला भाजपच्या नेत्याच्या समर्थकांनी केला असल्याचं बोललं जात आहे.

आज संध्याकाळी भागवत कराड यांच्या घरावर दुचाकीवर आलेल्या 8 ते 10 जणांनी अचानकपणे दगडफेक केली. या दगडफेकीत कराड यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. दगडफेक करून अज्ञात तरुण पसार झाले. या घटनेनंतर डॉ.भागवत कराड,आमदार अतुल सावे, भाजप प्रवक्ते शिरीष बोराळकर यांच्यासह भाजप शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यासाठी पोहोचले.

दरम्यान, भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचं बोललं जात आहे. किशनचंद तनवाणी यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. त्यांच्या सेनाप्रवेशावर कराड यांनी तनवाणी यांच्यावर विखारी टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आज कराड यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना घडली. संतोष सुरे, रंगनाथ राठोड, सचिन झवेरी यांनी हा हल्ला केल्याचं बोललं जात आहे. याबद्दल सचिन झवेरी याने फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये 'ज्याला स्वत:चे घर सांभाळता येत नाही तो भागवत कराड वर्तमानपत्रात अक्कल पाजळतोय, यापुढे कमरेखालेच वार होतील' असा इशारा दिला आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये शहर अध्यक्ष बदलण्यात आला होता. याच निर्णयातून कराड यांच्यावर हल्ला करण्यात आला असावा, अशी भाजपच्या गोटात नेते चर्चा करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 21, 2020 10:04 PM IST

ताज्या बातम्या