Home /News /maharashtra /

नागपुरात कुटुंबातील 6 जणांना कोरोनाची लागण, घरातील एकाचा कोरोनाने मृत्यू

नागपुरात कुटुंबातील 6 जणांना कोरोनाची लागण, घरातील एकाचा कोरोनाने मृत्यू

मुंबई, पुण्यातला धोका कायम आहे (प्रातिनिधिक फोटो)

मुंबई, पुण्यातला धोका कायम आहे (प्रातिनिधिक फोटो)

या रुग्णाच्या कुटुंबातील 6 सदस्य पॉझिटिव्ह आल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागपूरात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 25 वर गेली आहे.

  नागपूर, 10 एप्रिल : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात आता नागपूरमध्येही 24 तासात 6 कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी समोर आली आहे. रुग्णांच्या वाढत्या आकड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सतरंजीपुरा भागातील मृत्यु झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह 68 वर्षीय व्यक्तीच्या कुटुंबातील 6 व्यक्तींचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीला श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं 4 एप्रिलला मेयो या शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. पण 5 तारखेला त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचा तपासणी अहवाल आला असता ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली. या रुग्णाच्या कुटुंबातील 6 सदस्य पॉझिटिव्ह आल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागपूरात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 25 वर गेली आहे. नाशिकमध्ये झपाट्याने पसरतोय कोरोना, माळेगावमधील 5 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकड कोरोनामुळे मृतांचा आकडाही वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 25 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 229 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असून ती आता 1364 वर पोहोचली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्या विभागाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार, राज्यात गेल्या 24 तासांत 25 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 15 महिला तर 10 पुरुषांचा समावेश आहे. कोरोनाला नमवणारा 'भीलवाडा पॅटर्न', टीना डाबीने सांगितलं कसा दिला लढा? पुण्यातील 14, मुंबईत 9 तर मालेगाव आणि रत्नागिरीत प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात एकूण मृतांचा आकडा आता 97 वर पोहोचला आहे. प्रयोगशाळेत आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 30766 नमुन्यांपैकी 28865 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत तर 1364 जण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत 125 कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाच्या धास्तीने महिलेच्या अंत्यसंस्काराला आला नाही एकही नातेवाईक, अखेर.. राज्यातील जिल्हा आणि महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या... मुंबई- 876 पुणे महानगरपालिका- 181 पिंपरी चिंचवड मनपा- 19 पुणे ग्रामीण- 6 ठाणे मनपा -26 कल्याण डोंबिवली मनपा- 32 नवी मुंबई मनपा-31 मीरा भाईंदर-4 वसई विरार मनपा-11 पनवेल मनपा- 6 पालघर ग्रामीण एकूण-3 सातारा-6 सांगली -26 नागपूर मनपा-25 अहमदनगर मनपा- 16 बुलढाणा-11 अहमदनगर ग्रामीण-9 औरंगाबाद मनपा-16 लातूर मनपा-8 अकोला-9 मालेगाव-5 रत्नागिकी, यवतमाळ, उस्मानाबाद, अमरावती मनपा प्रत्येकी-4 कोल्हापूर मनपा -5 उल्हासनगर मनपा, नाशिक मनपा, नाशिक ग्रामीण, जळगाव ग्रामीण, जळगाव मनपा, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, वाशिम, गोंदिया, बीड, सिंधुदुर्ग प्रत्येकी-1 एकूण- 1370

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Manoj Khandekar
  First published:

  Tags: Corona

  पुढील बातम्या