नाशिकमध्ये झपाट्याने पसरतोय कोरोना, माळेगावमधील 5 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

मालेगाव शहरात कोरोनाचे 5 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

मालेगाव शहरात कोरोनाचे 5 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

  • Share this:
    नाशिक, 10 एप्रिल : राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये कोरोनाची महामारी पसरत चालली आहे. नाशिकमध्येही कोरोनाचे आणखी 5 नवे रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नाशिकमध्ये कोरोना बाधितांची संख्या 12 वर गेली आहे. या वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मालेगावमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढतो आहे. मालेगाव शहरात कोरोनाचे 5 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. 35 कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यातील सामान्य रुग्णालयातील 3 डॉक्टरांसह 27 नर्सचादेखील समावेश आहे अशी माहिती सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉ.हितेश महाले यांनी दिली आहे. हे वाचा - देशभरात 24 तासांत 591 नवीन पॉझिटिव्ह केसेस, कोरोनाग्रस्तांचा आकडा 5,865 वर एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकड कोरोनामुळे मृतांचा आकडाही वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 25 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 229 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत असून ती आता 1364 वर पोहोचली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्या विभागाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार, राज्यात गेल्या 24 तासांत 25 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 15 महिला तर 10 पुरुषांचा समावेश आहे. पुण्यातील 14, मुंबईत 9 तर मालेगाव आणि रत्नागिरीत प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात एकूण मृतांचा आकडा आता 97 वर पोहोचला आहे. दिलासादायक: सांगलीत 22 जण कोरोनामुक्त, कोरोनाबाधितांचा आकडा आला 4 वर प्रयोगशाळेत आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 30766 नमुन्यांपैकी 28865 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत तर 1364 जण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत 125 कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यातील जिल्हा आणि महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या... मुंबई- 876 पुणे महानगरपालिका- 181 पिंपरी चिंचवड मनपा- 19 पुणे ग्रामीण- 6 ठाणे मनपा -26 कल्याण डोंबिवली मनपा- 32 नवी मुंबई मनपा-31 मीरा भाईंदर-4 वसई विरार मनपा-11 पनवेल मनपा- 6 पालघर ग्रामीण एकूण-3 सातारा-6 सांगली -26 नागपूर मनपा-19 अहमदनगर मनपा- 16 बुलढाणा-11 अहमदनगर ग्रामीण-9 औरंगाबाद मनपा-16 लातूर मनपा-8 अकोला-9 मालेगाव-5 रत्नागिकी, यवतमाळ, उस्मानाबाद, अमरावती मनपा प्रत्येकी-4 कोल्हापूर मनपा -5 उल्हासनगर मनपा, नाशिक मनपा, नाशिक ग्रामीण, जळगाव ग्रामीण, जळगाव मनपा, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, वाशिम, गोंदिया, बीड, सिंधुदुर्ग प्रत्येकी-1 एकूण- 1364 संपादन - रेणुका धायबर
    First published: