मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'ती'ला मारलं अन् मृतदेह गोणीत टाकून पळाला, पण हवेत केस उडवण्याच्या स्टाईलमुळे 'तो' पकडला!

'ती'ला मारलं अन् मृतदेह गोणीत टाकून पळाला, पण हवेत केस उडवण्याच्या स्टाईलमुळे 'तो' पकडला!

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने व मृतदेहाजवळ ओळख पटवण्यासाठी कोणताही पुरावा नसल्याने त्याची ओळख पटवणे अवघड होते. तरी देखील...

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने व मृतदेहाजवळ ओळख पटवण्यासाठी कोणताही पुरावा नसल्याने त्याची ओळख पटवणे अवघड होते. तरी देखील...

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने व मृतदेहाजवळ ओळख पटवण्यासाठी कोणताही पुरावा नसल्याने त्याची ओळख पटवणे अवघड होते. तरी देखील...

नवी मुंबई, 24 ऑगस्ट : वाशी पोलीस (vashi police) ठाण्याच्या हद्दीत ब्रिजखाली अर्धवट गोणीत भरलेल्या अवस्थेत एक मृतदेह (dead body) आढळून आला होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने व मृतदेहाजवळ ओळख पटवण्यासाठी कोणताही पुरावा नसल्याने त्याची ओळख पटवणे अवघड होते. तरी देखील वाशी पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून अखेर आरोपीला गजाआड केले आहे. आरोपीला चालताना केस उडवण्याची सवय होती,त्याच्या या स्टाईलवरून पोलिसांनी त्याला 20 दिवसांत बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशी पुलाच्या खाली  2 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह गोणीत आढळून आला होता. सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मनपा रुग्णालयात पाठवला असता मृतदेहाच्या दोन्ही हातावर विशिष्ट प्रकारची डिझाईन गोंदलेली दिसून आली. घटनास्थळी मिळालेली प्लास्टिकची चप्पल, मृतदेहाची कपडे याव्यतिरिक्त कोणतेही ओळख पटवण्याचे साधन उपलब्ध नव्हते. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृतदेहाची ओळख पटवायची कशी हा मोठा प्रश्न होता.

मुंबईच्या महापौरपदासाठी रितेश देशमुख आणि सोनू सूदला उमेदवारी, काँग्रेसमधून मागणी

सदर गुन्ह्याचा तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांनी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल (Police Inspector Pramod Thoradmal) यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करून मुंबई शहर, ठाणे, नवी मुंबई ठिकाणी मिसिंग तक्रार शोधत असताना पोलिसांना गोवंडी पोलीस ठाण्यात सदर महिलेच्या मिळत्या जुळत्या वर्णनाची मिसिंग तक्रार मिळून आली. परंतु, मिसिंग महिलेचे वय 70 वर्ष होते, तर मिळून आलेल्या मृतदेहाचं वय साधारणतः ३५ ते ४० दिसून आले. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी नातेवाईकांना मिळालेली चप्पल, व कपडे आणि विशिष्ट डिझाईन च्या गोंदानामुळे मृतदेहाची ओळख पटली असून तो मृतदेह बबनबाई शांतीवन कांबळे (babanbai kamble) वय 70 वर्ष यांचा असल्याचे मृताच्या नातेवाईकांनी ओळखले.

मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृतदेह मिळाला त्याठिकाणची सीसीटीव्ही फुटेज तसेच वाशी टोलनाका, हायवे, वाशी स्टेशन, इन ऑरबीट मॉल व शहरातील इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदर महिला एकटीच इन ऑरबीट मॉल परिसरात वावरताना दिसली मात्र रात्रीच्या सुमारास सदर महिलेसोबत एक पुरुष चालताना दिसला.

त्यानंतर तो कधीच सेक्स करू शकला नाही; बायकोवर केलेला 'तो' प्रयोग महागात

संशयास्पद पुरुषाच्या शारीरिक हालचालींची शक्यता पाहून चौकशी केली. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी एक वेगळ्या स्टाईलने चालत होता आणि आरोपीला चालताना केस उडवायची सवय होती. या दोन गोष्टींच्या आधारावर पोलिसांनी आरोपी कानिफनाथ कांबळे (26) याला  हावरे फंटासियाजवळ असल्याचे कळाले, त्यानंतर तितल्या पोलिसांना कळताच पोलीस पथकाने त्यास अटक केली.

आरोपी कानिफनाथ दिलीप कांबळे हा सदर महिलेस जेवणासाठी घेऊन जातो म्हणून त्या महिलेस इन ऑरबिट मॉलच्या समोरच्या ब्रिजखाली अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत होता. महिलेने त्यास प्रतिकार करताच आरोपीने शेजारी असलेल्या काचेच्या तुकड्यांनी महिलेच्या गळ्यावर वार करून, चेहऱ्यावर दगडाने गंभीर जखमी केले आणि मृतदेह गोणीत भरून पलायन केले. हातात कोणतेही पुरावे नसताना फक्त आरोपीच्या स्टाईलवर आरोपीला अटक केल्याने वाशी पोलिसांचे कौतुक होतंय.

First published:
top videos