मुंबई, 23 ऑगस्ट : विवाहित दाम्पत्य (Married Couple) आपल्यातील प्रेम (Love), रोमान्स (Romance) कायम वाढवण्याचा प्रयत्न करतात (Relationship). यासाठी ते वेगवेगळे मार्ग (Sexual relation) निवडतात. किती तरी जण लैंगिक आयुष्यात (Sex Life) वेगवेगळे प्रयोग (Sexual experiment) करतात. एका तरुणाने आपल्या बायकोसोबत असाच एक प्रयोग करून पाहिला, जो त्याला चांगलाच महागात पडला. त्याचं लैंगिक आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे.
बायकोवर केलेल्या सेक्स एक्सपेरिमेंटची तरुणाला मोठी शिक्षा मिळाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो त्या एका छोट्याशा चुकीची शिक्षा भोगतो आहे. सोशल मीडियावर तरुणाने आपली व्यथा मांडली आहे.
फिसहोल या ट्विटर अकाूंटवर काही लोक आपलं नाव न सांगता आपल्या आयुष्यातील संबंधित गोष्टी सार्वजनिकरित्या सांगतात. इथंच या तरुणाने आपल्याबाबत सांगितलं.
हे वाचा - काय म्हणावं हिला! 23 वर्षे घालतेय एकच अंडरविअर; कंजूसपणाची हद्दच केली ना राव
त्याने सांगितलं, जेव्हा तो आणि त्याची अदर हाफ म्हणजे बायको सेक्स करायचे तेव्हा नेहमी तोच सुरुवात करायचा. त्यानंतर दोघांचा रोमान्स सुरू व्हायचा. एकदा त्याने ठरवलं की रोमान्सची सुरुवात तो करणार नाही त्याची बायकोच करेल. आपल्याला जितका रोमान्य हवा आहे, तितकाच आपल्या बायकोलाही हवा आहे का हे जाणून घेण्यासाठी एक एक्सपेरिमेंट म्हणून त्याने हे केलं.
तो प्रतीक्षा करत राहिला, सेक्सबाबत बायकोसोबत तो बोललाही नाही. पण यानंतर सर्वकाही उलटं झालं. त्याच्या बायकोने कधीच रोमान्सला स्वतःहून कधीच सुरुवात केली नाही. सेक्सबाबत न बोलल्यानेही तिला काही फरक पडला नाही. असं करता करता तीन वर्षे सरली. गेली तीन वर्षे या दोघांनी सेक्सच केला नाही.
हे वाचा - ‘सेक्स लाइफ’ सुधारण्यासाठी पुरुषांनी ‘या’ प्रकारे खावी बडीशेप; शीघ्रपतनाचा त्रास
गेल्या तीन वर्षांत या प्रयोगाचा परिणाम तो झेलतो आहे. आपण पत्नीसोबतचा रोमान्स खूप मिस करतो आहे. पण त्याला तिच्यासोबत जबरदस्ती किंवा तिच्या मर्जीशिवाय काहीच करायचं नाही. फक्त आपल्या आनंदासाठी आपल्या बायकोवर काहीही करण्यासाठी जबरदस्ती करायची नाही. त्यामुळे तो स्वतःसुद्धा याबाबत बायकोला काही सांगत नाही, असं तो म्हणाला.या व्यक्तीची ही पोस्ट पाहून इतर पुरुषही व्यक्त झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Sex, Sexual relationship, Wife and husband