मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

वरतून बरसतोय पाऊस आणि जमिनीतून आला मोठा आवाज, बीडमध्ये उडाली खळबळ

वरतून बरसतोय पाऊस आणि जमिनीतून आला मोठा आवाज, बीडमध्ये उडाली खळबळ

 भूकंपाच्या भीतीने संपूर्ण गाव रात्र जागून काढत आहेत. लहान मुलांसह वयोवृद्ध माणसं देखील घरात भेदरलेल्या अवस्थेत राहत आहेत.

भूकंपाच्या भीतीने संपूर्ण गाव रात्र जागून काढत आहेत. लहान मुलांसह वयोवृद्ध माणसं देखील घरात भेदरलेल्या अवस्थेत राहत आहेत.

भूकंपाच्या भीतीने संपूर्ण गाव रात्र जागून काढत आहेत. लहान मुलांसह वयोवृद्ध माणसं देखील घरात भेदरलेल्या अवस्थेत राहत आहेत.

बीड, 01 ऑक्टोबर :  अतिवृष्टीच्या आणि मुसळधार पावसाच्या (beed rain) अस्मानी संकटानंतर आता बीडमधील (beed) पिंपळ टक्का या डोंगरातील गावात भूगर्भातील गुढ आवाजामुळे नागरिक हैराण झाले आहेत. भूकंपाच्या भीतीने संपूर्ण गाव रात्र जागून काढत आहेत. लहान मुलांसह वयोवृद्ध माणसं देखील घरात भेदरलेल्या अवस्थेत राहत आहेत. भूगर्भातील हालचालीमुळे असे आवाज होऊ शकतात, असं भूगर्भ तज्ञ यांनी अंदाज व्यक्त केला आहे. मात्र आवाजचं खरं कारण अद्याप समोर आलं नाही.

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेलं हजार लोकवस्तीचं पिंपळटक्का गाव या गावात सोमवारी आणि गुरुवारी रात्री 11 वाजता प्रचंड मोठा आवाज झाला. आवाजाने पत्रे आणि भिंती हादरल्यामुळे घाबरलेली सगळीच लोक लहान मुलांना घेऊन घराबाहेर रस्त्यावर आलो खूप भीती वाटली होती. भूकंप होतो की काय असं वाटत होतं. त्यामुळे लहान मुलाला देखील झोपेतून उठून घराबाहेर काढले, पाच मिनिटं आवाज होत होता. त्यामुळे खूप भीती वाटत होती, असं गावातील नागरिकांनी सांगितलं.  यापूर्वी देखील असे आवाज आले होते, असं देखील गावातील नागरिकांनी सांगितलं.

अखेर सैफ अली खानच्या मुलाचीही बॉलिवूडमध्ये एंट्री; इब्राहिम अली खान 'या' भूमिकेत

'बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि अचानक झालेला आवाजामुळे आम्ही घरात झोपले असताना दचकून उठलो आणि घराबाहेर पळत सुटलो यातच लहान मुलांना पावसामध्ये आम्ही रस्त्यावर घेऊन उभे होतो. आता देखील खूप भीती वाटते भूकंप होतो की काय त्यामुळे झोप लागत नाही. तर लहान मुलांना घेऊन घरात झोपावं कसं  भूकंप तर होणार नाही ना? अशी भीती वाटत आहे असं गावातील महिलांनी सांगितलं.

'गावात दोन दिवसांपूर्वी रात्री 11.30 च्या दरम्यान मोठा आवाज झाला  भिंत पडली काय म्हणून आम्ही देखील घरातून बाहेर आलो त्यावेळी सगळ्या लोकांना बाहेर निघायला शेजारची माणसं सांगत होती पाच मिनिट काय होत आहे हे समजत नव्हतं मात्र नंतर आवाज शांत झाला त्यावेळी कसा बसा गावकऱ्यांना धीर दिला आणि सर्वांनी रात्र जागून काढली सकाळी महसूल प्रशासन आलं होतं त्यांनी पाहणी केली व भूगर्भ विभागाचे अधिकारी देखिल आले होते मात्र आवाजच खर कारण त्यांनी सांगितलेलं नाही लोकांमध्ये आज देखील प्रचंड भीती आहे. असं गावचे सरपंच संतोष कदम यांनी सांगितलं.

पत्नी डॉक्टरच्या केबिनमधून बाहेर पडताच, नवरा शिरला आत; डॉक्टरची भयावह अवस्था

पिंपळटक्का हे गाव माझ्या तलाठी सज्जामध्ये आहे त्या ठिकाणी नागरिकांनी गूढ आवाज आल्याचं सांगितलं.  त्यानंतर तहसीलदार साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही गावात गेलो होतो. भूगर्भातील तज्ञांनी पाहणी केली आहे मात्र अद्याप अहवाल आला नाही .आवाज पुन्हाझाला तर काळजी म्हणून बाहेर रस्त्यावरती थांबा अशी जनजागृती करत आहोत, असं तलाठी गुलाब कुचेकर यांनी सांगितलं.

अगोदरच अतिवृष्टीने घरं, संसार आणि पिके नेस्तनाबूत झालेली असताना आता भूगर्भातून होणाऱ्या आवाजामुळे भूकंप होतो की काय म्हणून गावकरी दहशतीखाली आहेत. प्रशासनाने प्रत्यक्ष भेट दिली मात्र भूगर्भातील गुढ आवाजाचे खरे कारण अद्याप समोर आले नाही. त्यामुळे या गावकऱ्यांची भीती घालवण्यासाठी खरं कारण सांगणे गरजेचे आहे.

First published:

Tags: Earthquake, भूकंप