Home /News /entertainment /

अखेर Saif Ali khan च्या मुलाचीही बॉलिवूडमध्ये एंट्री; Ibrahim Ali Khan 'या' भूमिकेत

अखेर Saif Ali khan च्या मुलाचीही बॉलिवूडमध्ये एंट्री; Ibrahim Ali Khan 'या' भूमिकेत

सारा अली खानपाठोपाठ (Sara Ali khan) सैफ अली खानचा (Saif Ali khan) मुलगा इब्राहिम अली खानही (Ibrahim Ali Khan) बॉलिवूडमध्ये.

मुंबई, 01 सप्टेंबर : बॉलिवूड (Bollywood) स्टारचा मुलगा किंवा मुलगी मोठे झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये (Bollywood celebrity kids) पदार्पण करणार असं समीकरण पक्कं रुजलं आहे (Star kids). अर्थात यालाही काही अपवाद असतात; पण बहुतेक वेळा बॉलिवूड स्टारची मुलं याच क्षेत्रात येत असल्याचं दिसून आलं आहे. सध्या बॉलिवूडमध्ये स्टार्सच्या नवीन पिढीची चर्चा आहे. सैफ अली खान (Saif Ali khan), चंकी पांडे, श्रीदेवी, संजय कपूर यांच्या मुलींनी अलिकडेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्यापाठोपाठ आता सैफ अली खान (Saif Ali khan's son), आमीर खान यांच्या मुलांच्या पदार्पणाचीही चर्चा सुरू आहे. सैफ अली खानच्या मुलाने अखेर बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे (Ibrahim Ali Khan in bollywood). इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे (Ibrahim Ali Khan bollywood entry). सैफ आणि अमृता सिंग (Amruta Singh) यांची मुलगी सारा अली खान (Sara Ali khan) आपल्या अभिनयानं बॉलिवूड गाजवत असतानाच तिचा धाकटा भाऊ इब्राहिमही बॉलिवूडमध्ये आला आहे. सैफ अली खान यानं स्वतः एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. पण त्याने अभिनय (Acting) क्षेत्राऐवजी दिग्दर्शनात (Direction) आपलं नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. सारापाठोपाठ इब्राहिमही अभिनय क्षेत्रात येईल अशी अटकळ होती. पण अभिनयाऐवजी दिग्दर्शनाला पसंती देऊन त्याने अनेकांचा अंदाज खोटा ठरवला आहे. हे वाचा - अरे..! ही तर किरण राव, आमिर खानसोबत घटस्फोटानंतरचे फोटो पाहून अनेकांना ती ओळखेना इब्राहिम खान करण जोहरच्या (Karan Johar) आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem kahani) या चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. या चित्रपटात रणवीर आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. या दिग्दर्शकीय कारकिर्दीसाठी इब्राहिम खान जोरदार तयारी करत असल्याचंही सैफनं सांगितलं. इब्राहिम खान एक लोकप्रिय स्टार किड असून, सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. आपली बहीण, अभिनेत्री सारा अली खान हिच्याशी त्याचं नातं अगदी पक्कं असून, दोघंही आपल्या सहलींचे, कुटुंबासोबत घालवलेल्या क्षणांचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. करीना, तैमूर आणि जेहबरोबरही हे दोघं भरपूर वेळ घालवतात. चाहतेही या बहीण-भावाच्या जोडीवर प्रेम करतात. हे वाचा - VIDEO: राणू मंडलने गायलं नवं गाणं, Manike Mange Hite मुळे पुन्हा होतेय ट्रेंड दरम्यान, सैफनं आपल्या सगळ्या मुलांबद्दल, त्यांच्या नात्याबद्दल दिलखुलासपणे सांगितलं. आपल्या वयाच्या 20, 30, 40 आणि 50 वर्षं या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मूल झालं होतं, ही सगळ्यात वेगळी बाब असल्याचं सैफनं मिश्कीलपणे सांगितलं. सैफ अली खान सध्या ओम राऊत (Om Raut) याच्या आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात प्रभास आणि कृती सॅनॉन यांची मुख्य भूमिका आहे. हिंदीसह तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळममध्येही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
First published:

Tags: Bollywood, Entertainment, Saif Ali Khan

पुढील बातम्या