जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / VIDEO : पत्नी डॉक्टरच्या केबिनमधून बाहेर पडताच, नवरा शिरला आत; डॉक्टरची केली भयावह अवस्था!

VIDEO : पत्नी डॉक्टरच्या केबिनमधून बाहेर पडताच, नवरा शिरला आत; डॉक्टरची केली भयावह अवस्था!

VIDEO : पत्नी डॉक्टरच्या केबिनमधून बाहेर पडताच, नवरा शिरला आत; डॉक्टरची केली भयावह अवस्था!

येथील स्थानिक डॉक्टरकडे महिला त्वचेसंदर्भातील समस्या घेऊन आली होती. नियमांनुसार, महिलेने पहिल्यांदा फॉर्म भरला आणि आपल्या वेळेसाठी वाट पाहू लागली. यादरम्यान महिलेचा पतीदेखील तिच्यासोबत होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

सायबेरिया, 1 ऑक्टोबर : रशियातील (Russia) सायबेरियामध्ये एका पतीने डॉक्टरांना (Husband beats doctor) मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका बातमीनुसार, येथील स्थानिक डॉक्टरकडे महिला त्वचेसंदर्भातील समस्या घेऊन आली होती. नियमांनुसार, महिलेने पहिल्यांदा फॉर्म भरला आणि आपल्या वेळेसाठी वाट पाहू लागली. यादरम्यान महिलेचा पतीदेखील तिच्यासोबत होता. जेव्हा महिलेचा नंबर आला तेव्हा ती आत डॉक्टरांना भेटायला गेली. डॉक्टरांनी सुरुवातीला तिच्या आजारपणाबद्दल विचारलं आणि तिचं म्हणणं ऐकून घेऊ लागला. डॉक्टर रुग्णाला म्हणाला, तुमची स्किन खूप चांगली आहे… यादरम्यान जेव्हा डॉक्टर हे महिलेला तपासत होते, तेव्हा त्यांच्या तोंडून निघालं की, तुमची स्किन तर खूप चांगली आहे. हे ऐकून महिला गप्प झाली. मात्र महिलेच्या पतीला हे आवडलं नाही. पहिल्यांदा तर महिलेच्या पतीने डॉक्टरला ऐकवलं. यानंतर त्याला मारहाण सुरू केली. डॉक्टरला तो बसलेल्या खुर्चीवर मारहाण केली. हे ही वाचा- Sex करणं पडलं महागात, मद्यधुंद बॉयफ्रेंडनं दाबला गळा; महिलेचा मृत्यू पतीने डॉक्टरला इतकं मारलं की, यात त्याची हाडं तुटण्याची वेळ आली. शेवटी कसंबसं करून लोकांनी त्याला पकडलं आणि डॉक्टरचा जीव वाचवला. डॉक्टरच्या डोक्याला आणि चेहऱ्यावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत. यानंतर डॉक्टर आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे. डॉक्टरने मेडिकल तपासणीदरम्यान मुस्लीम लॉचं पालन केलं नाही डॉक्टर व्लादिमीरने सांगितलं की, ते तपासणीनंतर केवळ इतकच म्हणाले की, तुमची त्वचा चांगली आहे. मात्र याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला.

जाहिरात

तर दुसरीकडे महिला आणि तिच्या पतीने आरोप केला आहे की, डॉक्टरने तपासणीदरम्यान मुस्लीम लॉचं पालन केलं नव्हतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात