जात-धर्म-पंथाच्या पलीकडे जाऊन ही मुस्लिम फॅमिली मनोभावे करते बाप्पाची सेवा

जात-धर्म-पंथाच्या पलीकडे जाऊन ही मुस्लिम फॅमिली मनोभावे करते बाप्पाची सेवा

सोहेल खान यांच्या घरात विराजमान झालेला गणपती बाप्पा खऱ्या अर्थानं हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक ठरला आहे.

  • Share this:

नागपूर, 29 ऑगस्ट: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला गणेशोत्सव सुरू आहे. यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट असलं तरी सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झालं आहे. या उत्साहाच्या वातावरणात जात-धर्म-पंथाच्या पलीकडे जाऊन एका मुस्लिम कुटुंबात गणपती बाप्पा विराजमान झाला आहे.

हेही वाचा...चालत्या-बोलत्या महालक्ष्मी.. सासूबाईनं केलं दोन्ही सुनांचं गौरी म्हणून पूजन!

राज्याची उपराजधानी असणाऱ्या नागपूर शहरातील पार्वती नगरातील रहिवासी सोहेल खान यांचे कुटुंबीय गेल्या 11 वर्षांपासून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करत आहेत. व्यक्ती आधी माणूस म्हणून जन्माला येते. त्यानंतर तो कोणत्या जातीचा, धर्माचा हे ठरत असतं, असं सोहेल खान सांगतात.

सोहेल खान यांच्या घरात विराजमान झालेला गणपती बाप्पा खऱ्या अर्थानं हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक ठरला आहे. सोहेल खान यांनी सांगितलं की, ते गेल्या 11 वर्षांपासून गणरायाची प्रतिष्ठापणा करतात. 'पहिल्या वर्षी गणपतीची मूर्ती घरी आणली. तेव्हा संपूर्ण रात्र जागून काढली होतं, असंही सोहेल खान यांनी सांगितलं. इतरांप्रमाणेच आपल्याही घरातही बाप्पा राहणार, या आनंदानं सोहेल खान यांना झोप लागली नाही. सोहेल खान यांच्यासोबत पत्नी कशीम, मुलगी सना, आर्यन आणि वीर ही दोन्ही मुले भक्तीभावाने सहभाग घेतात. त्याप्रमाणे पार्वती नगरातील सर्व जाती-धर्माची कुटुंबे, मित्रमंडळी खान कुटुंबात आरतीला एकत्र येतात.

कोण आहेत सोहेल खान?

सोहेल खान याचा प्रॉपर्टी डिलरचा व्यवसाय आहे. सोहेल खान यांचा थोरला मुलगा आर्यन यानं 11 वर्षांपूर्वी नगरातील सार्वजनिक गणेशोत्सव पाहिला आणि त्याच्या मनात बाप्पा रुजला. गणेशोत्सवात होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, दररोज होणारी आरती पाहून आर्यन भारावून गेला होता. तेव्हा सहा वर्षांचा असलेल्या आर्यन यानं आपल्या अम्मी-अब्बुंकडे घरीच गणपतीची प्रतिष्ठापणा करण्याची इच्छा व्यक्त केली.

हेही वाचा...आता हेच बघायचं राहिलं होतं! रुग्णालयात मांजरीला मिळाली सिक्युरिटी गार्डची नोकरी

मात्र, आपण मुस्लिम. गणपतीची घरात प्रतिष्ठापना केली तर आपला समाज काय म्हणेल, याचा सोहेल खान यांनी थोडाही विचार केला नाही. सोहेल खान यांनी आर्यनच्या कोवळ्या मनाचा विचार करून मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचं स्वागत केलं. जात-धर्म-पंथाच्या पलिकडे जाऊन सोहेल खान यांच्या घरी मोठ्या उत्साहात, भक्तीमय वातावरणात गणरायाची विधिवत स्थापना केली जाते. पूजा-अर्चा केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप दिला जातो.

Published by: Sandip Parolekar
First published: August 29, 2020, 6:01 PM IST

ताज्या बातम्या