आता हेच बघायचं राहिलं होतं! रुग्णालयात मांजरीला मिळाली सिक्युरिटी गार्डची नोकरी

आता हेच बघायचं राहिलं होतं! रुग्णालयात मांजरीला मिळाली सिक्युरिटी गार्डची नोकरी

इथे कोरोनामुळे लोक बेरोजगार होत आहेत आणि मांजरीला मात्र सिक्युरिटी गार्डची नोकरी मिळाली.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : एकीकडे कोरोनाच्या काळात बरोजगारीचं प्रमाण वाढत असताना कुणी म्हटलं की प्राण्यांना नोकरी मिळते तर आश्चर्याचा धक्काच बसेल. खरंच हैराण करण्यासारखी एक बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका मांजरीला रुग्णालयाचा सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी मिळाल्याचे फोटो आणि ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियातील Epworth Hospital एक भटक्या मांजरीला सिक्युरिटी गार्डची नोकरी मिळाल्यानं खळबळ उडाली आहे. या मांजरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मांजरीच्या गळ्यातील आयकार्डवर सिक्युरीटी असं लिहिलेलं दिसत आहे. या मांजरीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

हे वाचा-गवत खाता खाता गाढवाच्या तोंडात आला साप; काय झालं मग VIDEO पाहा

मिळालेल्या माहितीनुसार ही मांजर रुग्णालयाच्या गेटजवळ 1 वर्षांपासून फिरत होती. या मांजरीला पाहून रुग्णालयातील प्रशासनानं गळ्यात आयकार्ड घालण्याचा निर्णय घेतला आणि या मांजरीला अधिकृतपणे सिक्युरिटी गार्डचं आयकार्ड मिळालं आहे.

पॅथलॉजी विभागातील एका कर्मचाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार ही मांजर रुग्णालयाबाहेर सिक्युरिटी गार्डची नोकरी करते. एक दिवस या मांजरीच्या गळ्यात बॅच लटकलेला दिसला त्यानंतर समजलं की रुग्णालयाच्या सुरक्षा पथकाने ही मांजर भाड्याने घेतली आहे. ही मांजरही दिसायला खूप सुंदर आहे. रुग्णालयात येणाऱ्यांचं ही छान पद्धतीनं स्वागत करते. तिला पाहून रुग्णाच्या चेहऱ्यावरही वेदना विसरून काही सेकंदासाठी हसू उमलतं. मांजर इतकी चपळ आहे की दिवसातून अनेक वेळा रुग्णालयाभोवती फेऱ्या घालते. ही पोस्ट ग्रेटिट्यूड डीएनए नावाच्या ट्वीटर अकाऊंटने शेअर केली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 29, 2020, 5:01 PM IST

ताज्या बातम्या