नांदेड, 02 डिसेंबर: नवीन वर्षाच्या स्वागत करण्यासाठी अनेकजण थर्टी फर्स्टच्या पार्टीच (31st party) आयोजन करतात. पण सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे अशा पार्ट्या आयोजित करण्यावर निर्बंध घालण्यात आली आहेत. असं असताना देखील काही जणांनी विविध ठिकाणी पार्ट्यांचं आयोजन केलं आहे. अशाच प्रकारे नांदेडमध्ये (Nanded) आयोजित केलेल्या एका पार्टीत धक्कादायक प्रकार घडला आहे. पार्टी सुरू असताना झालेल्या वादातून एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. पार्टी सुरू असताना चार जणांनी आपल्या एका मित्राला मारहाण करत त्याला टेरेसवरून खाली फेकलं (4 young men threw friend from terrace) आहे. या धक्कादायक घटनेत संबंधित तरुणाचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. संबंधित घटना नांदेड शहरातील मालेगाव रस्त्यावरील गजानन मंदिराजवळील एका इमारतीत घडली आहे. तर संतोष हळदेकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. 31 डिसेंबरच्या रात्री मृत संतोष आपल्या अन्य चार मित्रांसमवेत बिल्डिंगच्या छतावर पार्टी करत बसला होता. पार्टी सुरू असताना क्षुल्लक कारणातून त्यांच्यात वाद झाला. या वादातून अन्य चार जणांनी संतोष याला बेदम मारहाण केली आहे. आरोपींनी हातातील कड्याच्या साहाय्याने मारहाण केली. हेही वाचा- नववर्षाच्या पहिल्याच दिवशी परभणीत रक्तरंजित घटना; 17 वर्षीय युवकाची भयंकर हत्या आरोपी मित्र एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी संतोषला मारहाण केल्यानंतर, त्याला चक्क बिल्डिंगच्या छतावरून खाली फेकलं आहे. या भयावह घटनेत संतोषचा जागीच मृत्यू झाला आहे. हत्येची ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, चारही आरोपींना अटक केली आहे. तसेच घटनेचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी संतोषचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. हेही वाचा- पत्नीच्या मदतीने पतीचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; माणुसकीला हादरवणारी घटना नववर्षाच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारे संतोषची हत्या करण्यात आल्याने कुटुंबीयांना देखील धक्का बसला असून त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 31 डिसेंबरची रात्र ही संतोषसाठी काळरात्र ठरल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास भाग्यनगर पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.