नागपूर, 12 जून: नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे कठोर प्रशासक म्हणून प्रसिद्ध आहेत. लॉकडाऊनचा फायदा घेत तुकाराम मुंढे यांनी दोन महिन्यांत शहरातील नद्याचं रुप पालटलं आहे. नागपूर महानगरपालिकेने खोलीकरण, साफसफाई आणि डी-सिल्टिंग करून शहरातील नद्यांचे पावसाळ्याआधीच पुनरुज्जीवन केलं आहे. तुकाराम मुंढे यांच्या कामगिरीची थेट राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.
हेही वाचा.. कोरोना हॉटस्पॉटमध्ये मटण पार्टीवरून महापालिका आणि पोलिस आयुक्तांमध्ये जुंपली
नागपूर महानगरपालिकेने खोलीकरण, साफसफाई आणि डी-सिल्टिंग करून शहराची जीवनरेखा असलेल्या नाग नदीचे पुनरुज्जीवन करण्यात आलं आहे. तुकाराम मुंढे यांनी लॉकडाऊनच्या कालावधीचा फायदा करून घेत पावसाळ्याआधीच शहरातील नदी स्वच्छता आणि पुनरुज्जीवनाचं काम पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. मुंढे यांनीच यासंदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली आहे. नद्या शहरातील चैतन्य आणि उत्साह जागा ठेवण्याचं काम करतात. त्यामुळे या नद्यांचं जतन, संरक्षण आणि मजबुतीकरण करणं आपलं काम आहे, असंही तुकाराम मुंढे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. यासोबत मुंढे यांनी एक व्हिडिओ जोडला आहे.
तुकाराम मुंढे यांच्या ट्वीटला कोट करुन आदित्य ठाकरे यांनी रिट्वीट करून त्यांचं कौतुक केलं आहे. नागपुरातील नाग नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्ही बांधील होतो आणि आम्ही ते करुन दाखवलं, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
तुकाराम मुंढेंनी ट्वीटसोबत जोडलेला व्हिडिओ...
#NagRiver is the lifeline of #Nagpur & has deep cultural ethos of the city. The rivers are vibrancy & vitality of the city, @ngpnmc has revived Ngp Rivers by deepening, cleaning & de-silting. It is our job to preserve, protect & strengthen the revival of these rivers@AUThackeraypic.twitter.com/aZ1sSKp7CM
Finally a project I was working closely on with Minister @iramdaskadam ji who initiated the plastic ban, has been approved by the Cabinet. I’m extremely happy that this focused ban on single use plastics will take effect soon. This was needed to protect our environment (1/2)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.