मुंबई, 31 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील एकूण 5 प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे शिंदे सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ‘पंतप्रधान मोदी हे देशाचं आहे. प्रत्येक राज्य त्यांना मुलाप्रमाणे असलं पाहिजे. जर प्रकल्प आसामला गेला असला तर मला बरं वाटलं असतं’ असं म्हणत तीव्र नाराजी व्यक्त केली. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ एकूण 5 प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहे. या मुद्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परखड भूमिका मांडली. ‘प्रकल्प बाहेर गेला म्हणजे गुजरातला गेला ना? माझं मत होतं की, पंतप्रधान देशाचं आहे. प्रत्येक राज्य त्यांना मुलाप्रमाणे असलं पाहिजे. जर प्रकल्प आसामला गेला असला तर मला बरं वाटलं असतं. पण जो तो प्रकल्प गुजरातला का जातो? मग माझ्या भूमिकेबदल संकोच का आहे? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थितीत केला. (फडणवीसांनी केली कानउघडणी, रवी राणा ‘गुवाहाटी’वरून नरमले, व्यक्त केली दिलगिरी!) असे प्रकल्प राज्यात इतर गेले तर विकास होईल. आजही राज्यात उद्योग धंध्याच्या बाबतीत पुढे आहे. गुजरातमध्ये फार चांगल्या सोयी आहेत असं काही नाही आहे, पण राज्यात पण चांगल्या सोयी सुविधा आहेत, असंही राज ठाकरे म्हणाले. सध्याचं राजकारण खालच्या पातळीच आहे. भाषाआहे ती देखील खालच्या पातळीची आहे, असंही राज ठाकरे म्हणाले. दिवाळीच्या निमित्ताने शिवतीर्थावर दिपोत्सवाचं उदघाट्न होतं. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस आले होते. आता यात त्यांना बोलावलं तर गैर काय आहे. मी जर कुठल्या कलाकाराला बोलावलं तर मग मी चित्रपट क्षेत्रात जाणार का? असं म्हणत राज ठाकरेंनी महायुतीच्या चर्चेवर बोलण्याचं टाळलं. (पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून 400 रुपयांची वसुली, महसूल मंत्री विखेंच्या जिल्ह्यातला LIVE VIDEO) ‘गेली बरीच वर्ष संघटना काम करत आहेत जर काही त्रास असतील, तोडगा काढणं त्या संदर्भात आजचीही बैठक आहे. 27 नोव्हेंबरला पक्षाच्या गटाध्यक्षांचा मेळावा गोरेगावला होणार आहे. हा मेळावा झाला की 28 तारखेला मी कोकण दौऱ्याला जाणारा, कोल्हापूरला जाऊन देवीचं दर्शन घेणार आहे, असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.