नेवासा, 31 ऑक्टोबर : अस्मानी संकटामुळे शेतकरी पुरता हवालदील झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिक पाण्यात वाहून गेले आहे. विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. पण, सरकारने साफ नकार दिला आहे. अशातच नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यासाठी 400 रुपये मागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच जिल्ह्यात हा प्रकार सुरू आहे. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी मागितले पैसे आहे. या बद्दलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
शेतकऱ्यांकडून नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी मागितले पैसे, महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यात धक्कादायक प्रकार pic.twitter.com/tsw6wjt4UX
— News18Lokmat (@News18lokmat) October 31, 2022
नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी एकरी चारशे रुपये मागितले जात आहे. नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी इथं शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात आहे. महसूल विभागाने नेमलेल्या पथकाकडून पैशांची मागणी केली जात आहे. (‘सत्तार मला कधीही आऊट करणार नाही, नेहमी जिंकण्यासाठीच..’; इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने पिकला हशा) एका सजग शेतकऱ्याने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. एकरी 400 रुपये मागितले जात आहे. एवढंच नाहीतर या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी पैसे दिले याची यादीही दाखवत आहे. या चर्चेदरम्यान एका जयश्री नावाच्या अधिकाऱ्याचे नाव सुद्धा घेतले जात आहे.
या प्रकरामुळे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. कामगार तलाठी आणि ग्रामसेवकाकडे कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (शिवसेनेला घेरण्यासाठी भाजपचा नवा डाव? BMC मधील 76 कामांची कॅगकडून होणार चौकशी) विशेष म्हणजे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकसान ग्रस्त भागाचा दौरा केला होता, त्यावेळी पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. पंचनामे झाले नसल्याने शेतकरी मदतीपासून अद्यापही वंचित आहे. त्यातच आता शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार सुरू आहे.