मुंबई, 13 ऑगस्ट : शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर एकाच पक्षात शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले आहेत. पक्षाला नवी उभारी देण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा दौरा सुरू आहे. तर उद्धव ठाकरेही देखील लवकरच महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहे. दरम्यान, आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस आणि भाजपवर हल्ला चढवला. यावेळी ठाकरेंनी थेट केंद्रातील मोदी सरकारलाच लक्ष्य केलं आहे. मार्मिक या मासिकाच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोदी सरकारने सुरू केलेल्या हरघर तिरंगा मोहिमेवर टीकास्त्र सोडलं. दोन दिवसांनी देशात 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने केंद्र सरकारने घरोघरी तिरंगा ही मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी जनतेला केलं आहे. यावर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली. घरावर तिरंगा ध्वज फडकवल्याने देशभक्त सिद्ध होत नाही. काहींकडे तर घरच नाही ते कुठे झेंडा फडकवणार? असा थेट सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मार्मिकचा 62 वर्धापन दिन मार्मिकचा वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे म्हणाले, परवा देशाचा अमृत महोत्सव आहे. कार्टुन कंबाईन्सने 1947 पासून व्यंगचित्र प्रकाशित करावी अशी इच्छा आहे. मी शिवसेनाप्रमुखांच्या व्यंगचित्रांचे पुस्तक काढू शकलो याचा आनंद. सगळं बदलतं पण परिस्थिती तीच आहे. देशाचा स्वातंत्र्याचा वर्धापन दिनानिमित्त बाळासाहेबांचे 1980 सालचे व्यंगचित्र दाखवले. अस्वस्थ मनाची व्यथा व्यंगचित्र मांडतो. 1978 सालचे अजून एक व्यंगचित्र, तो काळ भोगलेल्या पिढीला ते जाणवेल. मोरारजींची हेकडी वृत्ती दर्शवणारे ते व्यंगचित्र.
भाजप प्रदेशाध्यक्ष बनताच बावनकुळे ठाकरेंच्या टीकेचे धनी, खोचक शब्दांमध्ये निशाणा
मार्मिक केवळ साप्ताहिकाचे नाव नाही तर व्यंगचित्रे सुध्दा मार्मिक. काही लोकांकडे घर नसताना सरकार म्हणते घरघर तिरंगा. हा मार्मिकपणा आहे, असे व्यंगचित्र काढणारे आजही आहेत. आता आपण परत गुलामगिरीकडे चाललो का? प्रत्येक माणसाचे मत एकच असेल असे नाही. परंतु 8-10 दिवसापूंर्वी नड्डांनी जे वक्तव्य केले ते लोकशाहीला घातक आहे. एकच पक्ष टिकणार इतर पक्ष संपणार. त्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या नावात किती कुळं आहे मला माहित नाही. पण, कितीही कुळं आली तरी शिवसेना संपणार नाही.