मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

त्यांनी प्रदेशाध्यक्ष केलं त्यांची किती जरी कुळी उतरली तरी शिवसेना नष्ट करु शकत नाहीत : उद्धव ठाकरे

त्यांनी प्रदेशाध्यक्ष केलं त्यांची किती जरी कुळी उतरली तरी शिवसेना नष्ट करु शकत नाहीत : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंची चंद्रशेख बावनकुळेंवर टीका

उद्धव ठाकरेंची चंद्रशेख बावनकुळेंवर टीका

"त्यांनी प्रदेशाध्यक्ष केलं त्यांच्या नावावर किती कुळे आहेत माहिती नाही पण त्यांची किती जरी कुळी उतरली तरी शिवसेना नष्ट करु शकत नाहीत. मग ते बावन असतील किंवा एकशे बावन असतील. मला त्याचा फरक नाही", अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी टीका केली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Chetan Patil
मुंबई, 13 ऑगस्ट : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव घेत खोचक टीका केली आहे. ते मार्मिक साप्ताहिकाच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य आणि देशातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर रोखठोक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर टीका केली. "त्यांनी प्रदेशाध्यक्ष केलं त्यांच्या नावावर किती कुळे आहेत माहिती नाही पण त्यांची किती जरी कुळी उतरली तरी शिवसेना नष्ट करु शकत नाहीत. मग ते बावन असतील किंवा एकशे बावन असतील. मला त्याचा फरक नाही", अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी टीका केली. "मी पक्षप्रमुख आहे. मुख्यमंत्री होतो. पुन्हा शिवसेनेची सत्ता येईल. सत्ता ही येत-जात असते. पण नड्डा बोलले की, या देशात फक्त एकच पक्ष राहणार आहे. बाकी पक्ष संपत जाणार आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्ष केलं त्यांच्या नावावर किती कुळे आहेत माहिती नाही पण त्यांची किती जरी कुळी उतरली तरी शिवसेना नष्ट करु शकत नाहीत. मग ते बावन असतील किंवा एकशे बावन असतील. मला त्याचा फरक नाही", असं उद्धव ठाकरे म्हणाले. "प्रादेशिक पक्ष संपवून टाकायचे हे विचार लोकशाहीला घातक आहेत. देशाच्या स्वातंत्र्यांची मांडणी झालीय त्यामध्ये संघराज्याची मांडणी झाली आहे. घटकराज्य एकत्र येवून देशाचं स्वातंत्र्य निर्माण झालेलं आहे. तुम्हाला प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला संघराज्य पद्धत संपवायची आहे का? संघराज्य तुम्हाला नकोय का? नागरिकांचं हे मत आहे का? त्यावर निवडणुका झाल्या पाहिजे. तुम्ही आज गादीवर बसलात म्हणजे हम करे सो कायदा नाही. अमृत महोत्सवातच तुम्हाला लोकशाही मृतावस्थेत न्यायची असेल तर अमृत महोत्सव काय?", असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. (उद्धव ठाकरेंची नवी रणनीती, आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत, महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अंक?) "राजकारण हे आपल्या पाचवीलाच पूजलेलं आहे. लोकशाही म्हटल्यानंतर निवडणुका आल्याच. निवडणुका म्हटल्यानंतर राजकीय पक्ष आलेच. ते आलेच पाहिजेत. प्रत्येक माणसाचा मत एकच असतं असं नाही. आपली मतं मांडण्याची मुभा ज्या व्यवस्थेत असते तिला लोकशाही म्हणतात. पण गेल्या आठ-दहा दिवसांपूर्वी आपल्या देशाचा राज्यकर्ता असलेल्या भाजप पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेलं विधान लोकशाहीला घातक आहे की नाही याचा विचार केला पाहिजे", अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी घर घर तिरंगाच्या मुद्द्यावरुन भाजपवर टीका केली. ज्यांच्याकडे घर नाही ते तिरंगा लावणार कुठे? असा सवाल ठाकरेंनी केला. आझादी म्हणजे स्वातंत्र्य. आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र झालो त्याला 75 वर्ष झाली. त्याआधी दीडशे वर्षाचा गुलामगिरीचा कालखंड गेला. त्यानंतर 75 वर्ष पूर्ण करुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना आपण पुन्हा गुलामगिरीत जातोय का? हा विचार करायला हवा, असं ठाकरे म्हणाले.
First published:

पुढील बातम्या