जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / उद्धव ठाकरेंना मोठा हादरा; शिंदे गटाला मिळालं बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नाव

उद्धव ठाकरेंना मोठा हादरा; शिंदे गटाला मिळालं बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नाव

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे.

मुंबई, 10 ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती, त्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून समोर आली आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आहे. तर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह अन् नाव गोठवल्याचं जाहीर केलं होतं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती, त्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून समोर आली आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आहे. तर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह अन् नाव गोठवल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर दोन्ही गटाने तीन पर्यायी चिन्ह अन् नाव निवडणूक आयोगाकडे सोपवलं होतं. यानंतर आजा निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना यावर शिक्कामोर्तब केलं आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल ही तीन चिन्ह पाठवण्यात आली, तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा तीन नावांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. शिंदे गटाकडून सुद्धा उगवता सूर्य, गदा आणि त्रिशूळ ही तीन पक्ष चिन्ह मागण्यात आली होती. बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेबांची अशी 3 नावं शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पाठवली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात