मुंबई, 20 नोव्हेंबर : प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य आणि विचार वाचकांपर्यत पोहचविणाऱ्या अद्ययावत अशा 'प्रबोधनकार डॉट कॉम' या संकेतस्थळाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर रविवारी एका मंचावर आले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या एका विधानामुळे हे दोन्ही एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आमचे वैचारिक व्यासपीठ एक : ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले, की आज एक प्रकारे कौटुंबिक रूप पाहायला मिळत आहे. दोन नातू एकत्र आलेत. रामदास आठवले असे बोलले होते की तुम्ही प्रबोधनकरांचे नातू आणि आम्ही वैचारिक नातू. प्रकाश आंबेडकर यांना भेटताना वेळ काढावा लागतो. आमचे वैचारिक व्यासपीठ एक आहे. दोन विचारांचे वारसे पुढे घेऊन जात आहोत, असं वक्तव्य ठाकरे यांनी केलं आहे. या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पुढे ठाकरे म्हणाले, की प्रबोधनकार यांच्या विचारांच्या मुशीतून आम्ही तयार झालो. माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म आहे. काही आजोबा आता बोलत आहेत, त्यांचे नातू काय बोलतात माहीत नाही. वाट दाखवणारे महत्वाचे वाट लावणारे नव्हे. मुखवटा लावुन राज्य करत आहेत, तोडा फोडा आणि राज्य करा, हे सध्या सुरू आहे. बाळासाहेबांनी कधीही कोणाला जात विचारली नाही.
वाचा - टिकलीनंतर आता साडी; भिडेंनंतर सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने नवा वाद, Video
..त्यांच्यासोबत आम्ही : ठाकरे
स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी जे जे येतील त्यांच्यासोबत आम्ही आहोत. बाहेर हुकुमशाही सुरू आहे. राज्यं ही केंद्राची गुलाम नाहीत. राज्य आणि केंद्र समान आहेत. सत्ता पाहीजे मग लोकशाही पायदळी तुडवून सत्ता मिळवणाऱ्या अशा लोकांना खाली खेचले पाहीजे. आता कायदामंत्री बोलत आहेत कॉलेजमध्ये पारदर्शकता नाही, असं बोलत आहेत, हा मोठा प्रश्न आहे. पण, यांचा हेतू काय आहे? हे आधी स्पष्ट करायला हवं. पहिलं ते पिल्लू सोडतात. मग मोठं झालं की पालकत्व घेतात. लोकांना जागे करून उपयोग नाही, त्यांना जागं करून सोडणे योग्य नाही वेळ आलीय पुढे घेऊन जाण्याची. प्रबोधनकार नास्तिक नव्हते तर आस्तिक होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Prakash ambedkar, Uddhav tahckeray