अमित राय, प्रतिनिधी मुंबई, 05 ऑक्टोबर :प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटलयेथे फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देण्यात आली असून मुकेश अंबानी, नीता अंबानी यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. तसंच रिलायन्स एचएन हॉस्पिटल उडवून देण्याची धमकीही देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज 12.57 वा. सुमारास परिमंडळ २ अंतर्गत डी बी मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल च्या नंबरवर एका अनोळखी नंबरवरून धमकी देणारा कॉल प्राप्त झाला होता. (अंबानी कुटुंबीयांना धमकी प्रकरणातील संशयिताचा आणखी एक प्रताप उघड, याआधीही…) सदर धमकी देणाऱ्या व्यक्तीने रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची तसेच अंबानी कुटुंबियांच्या संदर्भात धमकी दिलेली होती. सदर धमकीच्या अनुषंगाने डॉ डी बी मार्ग पोलिस ठाणेस गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून प्रस्तुत प्रकरणी अधिक चौकशी मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे. (VIDEO - ताबा सुटलेल्या शिक्षिकांचं शाळेतच संतापजनक कृत्य; समोर विद्यार्थी आहेत याचंही भान त्यांना राहिलं नाही) याआधीही ऑगस्ट महिन्यात मुकेश अंबानी यांना आणि कुटुंबीयांना जीव मारण्याची धमकी देण्यात आली होती. भौमिक नावाच्या या मनोरुग्णाने रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटलमध्ये फोन करून अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या मानसिक रुग्णाने 7 ते 8 वेळा फोन केले होते. दरम्यान या धमकीनंतर रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलकडून डी.बी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवली आणि बोरिवलीतील MHB कॉलनीमधून त्याला अटक केली होती. त्यानंतर कोर्टात हजर केले असता जामिनावर सोडण्यात आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.