जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - ताबा सुटलेल्या शिक्षिकांचं शाळेतच संतापजनक कृत्य; समोर विद्यार्थी आहेत याचंही भान त्यांना राहिलं नाही

VIDEO - ताबा सुटलेल्या शिक्षिकांचं शाळेतच संतापजनक कृत्य; समोर विद्यार्थी आहेत याचंही भान त्यांना राहिलं नाही

VIDEO - ताबा सुटलेल्या शिक्षिकांचं शाळेतच संतापजनक कृत्य; समोर विद्यार्थी आहेत याचंही भान त्यांना राहिलं नाही

ज्ञानाच्या मंदिरात शिक्षिकांनीच विद्यार्थ्यांसमोर धक्कादायक कृत्य केलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Uttar Pradesh
  • Last Updated :

लखनऊ, 05 ऑक्टोबर :  शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर आणि इथले शिक्षक जे विद्यार्थी आणि समाज घडवत असतात. घरात आईवडील तर शाळेत शिक्षक मुलांवर संस्कार करत असतात. पण याच ज्ञानाच्या मंदिरात शिक्षिकांनीच विद्यार्थ्यांसमोर धक्कादायक कृत्य केलं आहे. एका शाळेतील शिक्षिकांचा संतापजनक असा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. उत्तर प्रदेशच्या हरिमपूर जिल्ह्यातील सरकारी शाळेतील ही घटना आहे. शिक्षिका शाळेतच आपसात भांडू लागल्या. विद्यार्थ्यांसमोरच त्यांनी तुफान फायटिंग केली. शाळेला त्यांनी आखाडा बनवून टाकलं. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता वर्गात काही विद्यार्थी उभे दिसत आहेत आणि दोन शिक्षिका आपसात भांडत आहे. एक शिक्षिका दुसऱ्या शिक्षिकेच्या हातातील मोबाईल खेचून घेत आहे असं दिसतं आहे. त्यानंतर या दोघींपैकी एक शिक्षिका आणखी एका दुसऱ्या शिक्षिकेसोबत हाणामारी करताना दिसते. दोघीही एकमेकींवर अक्षरशः तुटून पडतात. एकमेकींना ढकलतात. हे वाचा -  ऑनलाइन क्लासमध्येच 59 वर्षाच्या शिक्षकाचं किळसवाणं कृत्य, पॉर्न साईट पाहून… धक्कादायक म्हणजे शिक्षिकांमध्ये ही फायटिंग सुरू असताना विद्यार्थीही तिथंच आहेत. भांडणाऱ्या शिक्षिकांना आपल्यासमोर विद्यार्थी आहेत याचंही भान राहिलं नाही. त्या आपल्या फक्त मारामारी करत आहेत. शिक्षिकांना असं लढताना पाहून विद्यार्थीही घाबरलेलं असल्याचं दिसतं आहे.

जाहिरात

रिपोर्टनुसार गांधी जयंतीदिनी घडलेली ही घटना आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षिकांमधील भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला, पण शिक्षिका थांबल्या नाहीत. त्या भांडतच राहिल्या. या तिन्ही शिक्षिकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात