मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अंबानी कुटुंबीयांना धमकी प्रकरणातील संशयिताचा आणखी एक प्रताप उघड, याआधीही...

अंबानी कुटुंबीयांना धमकी प्रकरणातील संशयिताचा आणखी एक प्रताप उघड, याआधीही...

 पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवली आणि बोरिवलीतील MHB कॉलनीमधून त्याला ताब्यात घेतले

पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवली आणि बोरिवलीतील MHB कॉलनीमधून त्याला ताब्यात घेतले

पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवली आणि बोरिवलीतील MHB कॉलनीमधून त्याला ताब्यात घेतले

मुंबई, 15 ऑगस्ट :  प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (mukesh ambani) यांना आणि कुटुंबीयांना जीव मारण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली होती. अखेरीस पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतले आहे. ही व्यक्ती मानसिक रुग्ण असून याआधी त्याचं वय 55 ते 57 वर्ष वय आहे. त्याच्यावर याआधीही गुन्हे दाखल आहे. आज सकाळी  रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटलमध्ये एका अज्ञात व्यक्तीने फोन करून अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. या मानसिक रुग्णाने 7 ते 8 वेळा फोन केले होते.  दरम्यान या धमकीनंतर रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलकडून डी.बी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवली आणि बोरिवलीतील MHB कॉलनीमधून एका जणाला ताब्यात घेण्यात आले आहे.बिष्णू विदू भौमिक असं या मानसिक रुग्णाचे नाव आहे. त्याने याआधीही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून चौकशी करत आहे. दरम्यान,  रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटलमध्ये हे फोन करण्यात आले होते. एकूण 8 फोन करण्यात आले होते. सकाळी 10.45 ते दुपारी 12.00 पर्यंत त्याने हे कॉल केले होते. या व्यक्तीने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयाला जीवे मारण्याची धमकी दिली.  या व्यक्तीने एकापाठोपाठ असे 8 फोन कॉल केले होते, या प्रकारानंतर आम्ही डीबी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती , रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटलच्या डॉ. तरंग ग्यानचंदानी यांनी दिली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्त मानसिक रुग्ण आहे. बिष्णू विदू भौमिक असं त्याचं नाव आहे. त्याच्याविरोधात धमकी देणे, जीवे मारण्याची धमकी देणे, अर्वाच्च भाषा वापरणे याबद्दल गुन्हे दाखल केले आहे. समोरील व्यक्ती हा वारंवार एकच बोलत होता, मी अंबानी कुटुंबीयांना मारणार आहे, त्यांना मरावेच लागणार आहे, असं तो फोनवर बोलत होता. पोलिसांनी हे फोन कॉल रेकॉर्ड ऐकले आहे. त्यावरून ही व्यक्ती मानसिक रुग्ण किंवा कुठल्या तरी तणावाखाली असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. त्यानंतर तपासाची सूत्र फिरवली आणि बोरिवलीमधून विष्णूला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, अंबानी कुटुंबीयांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. अंबानी यांच्या सुरक्षारक्षक व्यवस्थापकांशी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपर्क केला आणि संपूर्ण प्रकरणाची कल्पना दिली. जर सुरक्षा वाढवण्याची गरज असेल तर तातडीने पाऊलं उचलली जाणार आहे. अंबानी यांच्या अँटलिया या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
First published:

पुढील बातम्या