मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता

BREAKING : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

    मुंबई, 08 ऑगस्ट : शिंदे आणि भाजप सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. पण आता उद्या मंगळवारी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त मिळाला आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी नुकतीच दिल्लीवारी केली आहे. आज दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्या मंगळवारी सकाळी विस्तार होण्याची शक्यता आहे.  विधानभवनातील हॉलमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार आहे. काही नावावर फेर विचार करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक सुरू आहे. सध्याच्या राजकीय घड़ामोड़ीमुळे काही नावावर फेरविचार होऊ शकतो. कोणताही आरोप नसलेला स्वच्छ प्रतिमेचा नेता मंत्रिमंडळात असाचा अशी दोघांची इच्छा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांचे नाव कापले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. आजच शिंदे सरकारकडून राज्यपालांना मंत्र्यांच्या शपथविधीबद्दल माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. तसंच, पावसाळी अधिवेशन हे 10 ते 18 तारखेदरम्यान बोलावले जाण्याची माहितीही समोर आली आहे. (आलियाच्या पोटी जन्म घेणार ऋषी कपूर? अभिनेत्रीची डिलिव्हरी डेट आली समोर) दरम्यान, काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले होते. फडणवीस यांनी दिल्लीत जावून भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली होती. फडणवीस यांची गेल्या महिन्याभरात अनेक दिल्ली वाऱ्या झाल्या आहेत. या दरम्यान त्यांची अनेकवेळा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा झाली. पण मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी द्यावं, यावर पक्षश्रेष्ठींसोबत एकमत होत नव्हतं, अशी चर्चा आहे. पक्षश्रेष्ठींना महाराष्ट्रात आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात पॅटर्न अवलंब करायचा आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. (Floating City : जगातील पहिलं तरंगतं शहर, हॉटेल, मॉल आणि घरंही असणार पाण्यावर) पण गुजरात पॅटर्ननुसार सर्वच नव्या चेहऱ्यांना संधी दिली तर राज्य कारभार करण्यास पुढे अडचणी येऊ शकतील. त्यामुळे काही नवे चहरे आणि काही जुने चेहरे यांच्यातील समन्वय साधून विस्तार करण्यात यावा, अशी फडणवीसांची भूमिका असल्याची माहिती सूत्रांसकडून मिळाली आहे. . पण त्या यादीत नेमके कुणाकुणाची नावे आहेत ते अद्याप समजू शकलेलं नाही. या दरम्यान भाजप पॅटर्नच्या चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्रात भाजप पॅटर्न जर अवलंबला गेला तर राज्यातील अनेक भाजपच्या बड्या नेत्यांना धक्का बसू शकतो. पण भाजपच्या पक्षश्रेष्ठींचा निर्णय त्याबाबत झाला असेल तर तो निर्णय मान्य करणं त्यांच्यासाठी अनिवार्य राहील.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या