मुंबई, 08 ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट मागच्या काही दिवसांपासून तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. 2022 हे वर्ष आलियासाठी फारचं खास ठरलं आहे. वर्षांच्या सुरुवातीच्या महिन्यात आलियाचे महत्त्वाचे सिनेमे प्रदर्शित झाले. त्यानंतर आलिया भट्टनं अभिनेता रणबीर कपूरबरोबर लग्न केलं. लग्नानंतर एकीकडे आलियाच्या डार्लिंग्स आणि ब्रम्हास्त्र या सिनेमाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे अभिनेत्रीनं ती आई होणार असल्याची बातमी तिच्या चाहत्यांना दिली. आलिया भट्ट प्रेग्नंट असल्याचं कळल्यापासून सगळीकडे फक्त तिचीच चर्चा आहे. आलियाचं बाळ कोणासारखं दिसेल इथपासून ते ती बाळाचं नाव काय ठेवणार या सगळ्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. दरम्यान आलियाच्या डिलिव्हरी डेट समोर आली आहे. आलिया तिच्या बाळाला कधी जन्म देणार याबाबत तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागलेली असताना अभिनेत्रीची डिलिव्हरी डेट समोर आली आहे. DNAनेनं दिलेल्या वृत्तानुसार, आलिया भट्ट आता चार महिन्यांची प्रेग्नंट आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात आलियाची डिलिव्हरी होऊ शकते. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांनुसार आलिया आणि रणबीर यांनी बाळाच्या जन्मसाठी हॉस्पिटल देखील बुक केलं आहे. आलिया सध्या प्रेग्नंसीसाठी आवश्यक असलेल्या सगळ्या टेस्ट करत आहे. अभिनेता रणबीर कपूर तर या दिवसात फारच एक्साइट असल्याचं म्हटलं जात आहे. कारण येणाऱ्या महिन्यात आलिया आणि त्याचा ब्रम्हास्त्र हा पहिला सिनेमा प्रदर्शित होणार आहे त्याचप्रमाणे त्यांच्या बाळाचा जन्मही होणार आहे. हेही वाचा - Alia Bhatt baby bump: आलियाचा बेबी बम्प लपता लपेना; क्युट कपलवर प्रेमाचा वर्षाव त्यामुळे 2022 वर्षाचा शेवटही आलिया रणबीरसाठी खास ठरणार आहे.
आलियानं जून महिन्यात इन्स्टाग्रामवर सोनाग्राफी रुममधील रणबीरबरोबरचा फोटो शेअर करत तिच्या प्रेग्नंसीची खुश खबर तिच्या चाहत्यांना दिली. काही दिवसातच आलिया सिनेमाच्या प्रमोशनसाठी काहीशा ढिल्या कपड्यात समोर आली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच आलियाचे ब्राऊन शॉर्ट गाऊनमधील काही फोटो व्हायरल झाले ज्यात ती तिचा क्यूट बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. आलियाचे हे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले. आलियाचा प्रेग्नंसी ग्लो तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. तिच्या चाहत्यांनी तिचे हे क्यूट फोटो पाहून प्रेमाचा वर्षाव केला. मीडिया रिपोर्टनुसार, आलियाला मुलगा हवा आहे. त्यांच्या आयुष्यात छोटा रणबीर यावा अशी आलियाची इच्छा आहे. पण रणबीरला मात्र पहिली मुलगी व्हावी असं वाटतंय. तर आलियाच्या पोटी ऋषी कपूर जन्म घेतील अशा चर्चा सध्या सुरू आहेत. आलियाचा पायगुण कपूर घराण्यासाठी चांगला आहे, अशा कमेंट्सही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.